समस्त हिंदूचे आराध्य दैवत असलेले भगवान प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव तसेच श्री साईनाथ महाराज यांचा पंचवीस वे मंदिर वर्धापनदिन रोहा तालुक्यातील मुठवली बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
मुठवली गावचे सुपुत्र तथा मराठी कापड उद्योगजक रामशेठ कापसे यांच्या निवासस्थानी हा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली पंचवीस वर्षे अविरतपणे चालत असलेला हा प्रभू श्री रामनवमी आणि श्री साईनाथ महाराज मंदिर वर्धापनदिन उत्सव सोहळा यंदाही मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी या निमित्ताने श्री साईनाथ महाराज यांच्या मूर्तीवर जलाभिषेक पूजन महाआरती भजन कीर्तन जागर असे धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
सदरच्या कार्यक्रमप्रसंगी रोहा खारगाव येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप उदय महाराज बंद्री यांचे सुश्राव्य कीर्तनरूपी सेवेचा लाभ उपस्थित ग्रामस्थ व भक्तगण यांना मिळाला तर या प्रसंगी राम म्हणता रामचि होईजे। पदी बैसोन पदवी घेईजे ।असे सुख वचन आहे ।विश्वासे अनुभवे पाहे । रामरसाचिया चवी। आन रस रुचती केवी ।। तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगे ।।४। या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे चिंतन करत सांगितले की राम नामातच सामर्थ्य आहे,भक्ती केल्याने दुःख हरण झाल्याशिवाय राहणार नाही तसेच सन १९१२ मध्ये श्री साईबाबानी शिर्डी सारख्या ठिकाणी जिथे मोठी मुस्लिम वस्ती अशा ठिकाण भगवान प्रभू श्री रामाचे भजन केले ओम नामाचे जप केला कथा केली म्हणुनच ते ओम साई राम त्यात देखील मोठे सामर्थ्य ओम म्हणजे राम,सा. म्हणजे साक्षात,ई.म्हणजे ईश्वर त्याच प्रमाणे राम सखाराम कापसे यांच्या नावात देखील दोनदा राम आला राम सखाराम त्यामुळे खरे राम भक्त साई भक्त रामशेठ कापसे यांना खरी राम भक्तीची प्रचित आल्याने सारे वैभव आहे त्यामुळे गेली पंचवीस वर्षे अविरतपणे हा उत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असल्याचे विवेचन हभप उदय महाराज बंद्री यांनी विवेचन केले.
गायनाचार्य अजय तेलंगे, संदेश खेरटकर,मृदुंगचार्य व टाळकरी आरे पंचक्रोशी यांची उत्तम साथ लाभली तर प्रसंगी सदरच्या कार्यक्रमाला युवा नेते तथा गोवे ग्राम पंचायत सरपंच महेंद्र शेठ पोटफोडे, नरेंद्र शेठ जाधव, नारायण राव धनवी,नरेंद्र पवार, बबन म्हसकर, प्रमोद लोखंडे, योगेश धामणसे , अजय कापसे, लहू पिंपळकर यांनी श्री साईनाथ महाराज यांचे दर्शन घेत कापसे परिवारांना शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.