राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होत असताना जेष्ठ नागरिकांना सुध्दा राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजनेस सुरुवात करण्यात आली असून त्यास जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
माथेरानमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या योजनेत ६५ वर्षावरील जेष्ठांना एकदाच ३००० रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मिळणार असून या योजनेतून पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार उपकरणे खरेदी करता येतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळपास 50 लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.
यावेळी भाजपचे चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कृष्णा सुहासिनी शिंदे,रजनी कदम, अनंत शेलार,अरविंद रांजाणे आदी मंडळींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
———————————————
जेष्ठ नागरिकांना आवश्यक असणाऱ्या श्रवणयंत्र,चष्मे, हँडस्टिक,वगैरे वस्तू त्यांना खरेदी करता याव्या त्यासाठी महायुती सरकारने महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. माथेरान शहरातील जेष्ठ नागरिकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता यावा यासाठी भारतीय जनता पार्टी माथेरान शहर व माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने शहरातील अनेक 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले असून या शिबिरीसाठी शहरातील जेष्ठ नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला या योजनेपासून कोणतेही जेष्ठ नागरिक वंचित राहू नये म्हणून शनिवार रविवार वगळून सदरचे शिबीर सुरु ठेवण्यात येईल.
…चंद्रकांत जाधव, भाजप रेल्वे प्रवासी जिल्हा कार्यकारिणी सदस्य
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.