‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ स्वार्थी म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान : सुनील तटकरे

Sunil Tatkare
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे असे मानतो.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील जैन वाडी येथे विधानसभेचे अलिबाग मुरुड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचार सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान सभा अध्यक्ष अमित नाईक, भाजपचे महेश मोहिते,  मनोज भगत, हसमुख जैन आदी सहित महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, देशात भारतीय जनता पक्ष प्रणित एन डी ए चे सरकार आहे. तसेच महाराष्ट्रात भाजप प्रणित युतीचे सरकार आहे. सत्ता असली तर विकास हा गतिमान होतो. याचा विचार करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालो. सत्ता हे उपभोगण्याचे साधनं नसून ती सेवा करण्याचे आहे.
महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. त्या योजनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना आत्मीयता वाटते. लाडक्या बहि‍णींबाबत निर्माण झालेला विश्वास हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण निवडणुका येतात आणि जातात”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.ज्या वेळेला लाडकी बहिण योजना आणली त्यावेळेला राज्य सरकार आर्थिक संकटात जाईल. पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाहीत. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी वक्तव्य केले की आमचे सरकार आले तर योजना बंद करू. मात्र आता महा आघाडी ने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात महीलांसाठी महालक्ष्मी नावाची योजना आणून तीन हजार रुपयाचा निधी देवू असे नमूद केले आहे. काही बदल करणाऱ्या योजना आम्ही मागच्या ४ महिन्यात केल्या आहेत.
लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे.ती आम्ही २१०० रुपये करणार आहोत. २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार
आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. २० टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातल्या ग्रामीण भागात रस्ते करणार आहोत,असेही तटकरे यांनी सांगितले आहे.
यावेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी सांगितले की अकराव्या निवडणुकीला सामोरे जात आहे.ग्राम पंचायत पासून आता पर्यंतची ही अकरावी निवडणुक आहे.माझी लढाई ही विरोधकांशी नसून ती माझ्याशी आहे.राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यकर्ते आम्ही प्रत्येक निवडणूक लढवली . सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत 38 हजार हुन अधिक मतांधिक्य अलिबाग विधान सभा मतदार संघात दिले होते.राजकीय जीवनाचे सगळे डावपेच आपण सगळेजण आणि म्हणून ही निवडणूक लढत असताना खऱ्या अर्थाने 2019 ला आपण आमदार केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास मुरुड शहर आणि ग्रामीण भागाचा करत असताना आपल्या मनातल्या अनेक प्रश्न असतील अनेक विकास काम असतील ते खऱ्या त्याने सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला म्हणून शहराला 287 कोटी रुपयाचा निधी दिला असून ग्रामीण भागात दहा हजार कोटीहून अधिक निधि विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
आज खऱ्या अर्थाने ही सभा दिशादर्शक आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना भावली निश्चितच माझ्या भगिनींना माझ्या बहिणींना मदतीचा हात घेऊन येणारी योजना आहे पंधराशे रुपये कदाचित आपल्यासाठी काही नसतील पण त्यांच्यासाठी ते पंधरा हजारहुन जास्त असेल या वेळेला काय झालं ते चालेल पण महायुतीला ज्या ज्या ठिकाणी आपण निवडून देण्यासाठी आपल्या घरातल्या पुरुष मंडळीला आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगायचं आहे.असे आवाहन दळवी यांनी यावेळी केली.
यावेळी भाजपचे नेते महेश मोहिते यांनी सांगितले की, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या रायगड जिल्ह्यातून आक्रमक असतील आपल्या सगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे आणि ते वातावरण निर्माण झालले.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले पाहिजे. भाजप मध्ये बंडखोर करीत त्याने महायुतीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाजपने हकालपट्टी केल्यानंतर आता ते काळोखात बॅटरी घेवुन कुठे मते भेटतात का हे पाहण्यासाठी चाचपडत फिरत आहेत.
यावेळी गेल्या अडीच वर्षातील आमदार महेंद्र दळवी यांच्या कामकाजातील कुशलता आणि हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची कार्यपद्धती पाहून राजपुरी, शिघ्रे ग्रामपंचायत, एकदरा या भागातील शेकडो कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading