मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर झाला असून, ६० फेलोंची निवड केली जाणार आहे. हा उपक्रम तरुणांना प्रशासनात कामाचा अनुभव देऊन त्यांच्या ज्ञानवृद्धीस मदत करणार आहे.
फेलो म्हणून पात्र होण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा, कोणत्याही शाखेतील पदवी (किमान ६०% गुणांसह) व १ वर्षाचा पूर्णवेळ अनुभव आवश्यक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे तसेच संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. वयोमर्यादा २१ ते २६ वर्षे आहे.
ऑनलाईन अर्ज व ५०० रुपये शुल्कासह उमेदवारांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, निबंध लेखन व मुलाखत होईल. अंतिम निवड झालेल्या फेलोंना १२ महिन्यांसाठी कामाची संधी मिळेल. मानधन ५६,१०० रुपये व प्रवास भत्ता ५,४०० रुपये असेल.
फेलोशिपदरम्यान IIT मुंबईच्या सहकार्याने पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येईल. फेलोंसाठी व्याख्याने, कार्यशाळा, व सामाजिक संस्था भेटींचे आयोजन होईल. फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शासन व शैक्षणिक संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाईल.
अधिक माहितीसाठी mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.