
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे शुभाशिर्वाद घेतले. तसेच शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, डॉ. सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी तसेच धर्माधिकारी कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.