मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था आणि BMC तर्फे शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान सोहळा संपन्न

raktadan
मुंबई ( निलेश कोकमकर ) : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून प्रचार आणि प्रसार जरी होत असला तरी मुळात रक्तदात्याची संख्या ही खूप कमी आहे. आणि त्यातच रक्तदानाबद्दल समाजात अजून ही अनेक गैरसमज आहेत. देशाची लोसंख्या जवळजवळ १४० कोटी असली तरी केवळ ०.८ टक्केच रक्तदान केले जाते. अशातच स्वतःच्या रक्ताने आणि SDP (प्लेटलेट्स) ने अनेकांचे प्राण वाचणारे खरे जीवनदाते ठरणारे विशेषतः शतकवीर रक्तदाते म्हणून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था आणि मुंबई महानगर पालिकेच्या वतीने 14 जून 2023 ‘जागतिक रक्तदाता दिवस’ च्या निमित्ताने “शतकवीर रक्तदात्यांचा विशेष सत्कार सोहळा” दिनांक 28 जुलै 2023 रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, हॉल क्रमांक दोन, वडाळा पश्चिम, मुंबई येथे संपन्न झाला.
या मध्ये शतकवीर रक्तदाता म्हणून  गणेश आमडोसकर, प्रशांत म्हात्रे, डॉ. प्रागजी वाजा, .गजानन नार्वेकर,  मनीष सावंत यांच्या अन्य १४ शतकी रक्तदान करणाऱ्या शतकवीरांचा विशेष सन्मान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री विजयकुमार करंजकर (अति प्रकल्प संचालक)  रमाकांत बिराजदार (प्रकल्प डॉ.संचालक) आणीन मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शतकवीर रक्तदाता म्हणून संबोधित करताना जीवनदाता संस्थेचे श्री गणेश आमडोसकर यांनी रक्तदान क्षेत्रासोबतच संस्था करीत असलेल्या इतर उपक्रमाची माहिती दिली. त्यांच्या संस्थेच्या येणाऱ्या नवीन सामाजिक उपक्रम ‘संकल्प मरणोत्तर देहदानाचा’ नोंदणी अभियान याबद्दल माहिती दिली.
अवयव दान व देहदान यातील फरक थोडक्यात सर्वांना समजावून सांगितला. जीवनदाता संस्था रक्तदान क्षेत्रासोबतच आता देहदान तसेच अवयव दान क्षेत्रात सुद्धा कार्यरत होत आहे. गणेश आमडोसकर यांनी जीवनदाता सामाजिक संस्था आयोजित करत असलेल्या फक्त महिलांसाठीच विशेष रक्तदान शिबीरा बद्दल माहिती दिली. महिला रक्तदानात मागे नाहीत. हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी डॉक्टर प्रागजी वाजा यांनी सुद्धा रक्तदात्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अपर्णा पवार, सहाय्यक संचालक मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था यांनी केले. यावेळी सह सूत्रसंचालक म्हणून  अश्विनी लोहार,  सुनीता घमेंडी तसेच  कविता ससाणे मॅडम यांनी सूत्रसंचालन जबाबदारी पार पाडली आणि हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading