मुंबई -गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक : ट्रॅफिक जाम

Trafic

सुकेळी ( दिनेश ठमके ) :

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असतांना चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबई -गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असतांनाच महामार्गावरील सुकेळी खिंडीमध्ये कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुरु. ( दि.५ ) रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या दोन एस टी बसमध्ये समोरासमोर धडक बसुन अपघात घडला . सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांच्या जवळपास २ ते ३ किमी. पर्यंत रांगा लागुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती 
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहीतीनुसार कणकवली आगाराची मुंबईकडे जाणारी कणकवली – बोरीवली एस टी क्रं.एम . एच. १३ सी. यु. ६६१६ चालक बाबाजी गणपत राणे( वय- ५०) हे आपल्या ताब्यातील बस घेऊन सुकेळी खिंडीमध्ये आले असता एका वळणावरती पनवेल आगाराची महाडकडे जाणारी एस टी क्रं. एम. एच. २० बी. एल. २७५१ या गाडीचा चालक आर्यन पाटील ( वय- ३८) याचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरुन येणा-या एस टी बस ला समोरासमोर जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दोन ते तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान या अपघातामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या मार्गावर वाहनांच्या जवळपास २ ते ३ किंमी पर्यंतच्या लांबच लांब रांगा लागुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे अक्षरशः हाल झालेले दिसुन येत होते.
या अपघाताची खबर मिळताच वाकण टॅबच्या सहायक पोलिस निरीक्षक गितांजली जगताप यांच्यासह त्यांचे सर्व कर्मचारी तसेच नागोठणे पोलीस, कोलाड पोलिस यांनी अथक प्रयत्न करुन दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून जवळपास ३ ते ४ तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीतरित्या सुरू करण्यात आली.
मात्र दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव काळातली सुकेळी खिंडीमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही यावर्षी देखिल कोकणवासीयांना आजमवायला मिळाली ही एक कोकणवासीयांची शोकांतिका म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading