मुंबई गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट, रात्री ठरतात अपघातांचे कारण

Gure

कोलाड ( श्याम लोखंडे ) :

मुंबई गोवा महामार्गावर विशेषतः इंदापूर ते सुकेळी दरम्यान मोकाट गुरांना वाली नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर दुसरीकडे मार्गावरच गोठण मारून बसणारी गुरे ढोरे ही आपघातला कारणीभूत ठरत असून या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. या मार्गावर आंबेवाडी कोलाड नाक्यावर, भिरा फाटा, तटकरे कॉम्प्लेक्स, हॉटेल प्रभाकर, कोलाड पोलिस चौकी समोर, खांब, सुकेळी खिंड अशा ठिकाणी तसेच ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत.
कोलाड आंबेवाडी नाक्यावरील आठवडाबाजारपर्यंत असंख्य मोकाट जनावरे फिरत असून ही जनावरे अपघाताला निमंत्रण देत आहेत. गेल्या महिनाभरात अनेक छोटे मोठे अपघात या मोकाट जनावरांमुळे घडले असल्याचे समजते. तर घडलेल्या आपघातात दोन दुचाकीवर प्रवास करणारे प्रवाशी जखमी झाले आहेत तर मोठ्या वाहनांमुळे गुरे दगावले असल्याचे समजते. तसेच गेले दोन दिवसांपूर्वी एका आज्ञात वाहनाच्या धडकेत एक वासरू गंभिर जखमी झाले होते तर सदरील नागरिकांच्या प्रसंगावधाामुळे त्या त्या जखमी वासरवर प्राणीमिञ कुमार देशपांडे यांना बोलावून उपचार करुन त्याला जीवदान देण्यास यश मिळवले.
तसेच कोलाड आंबेवाडी नाक्यावर मार्गालगत नवीन गटार लाईन बनवली गेली त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले त्यांची झाकणे तुटल्याने काही मोकाट गुरे सैरा वैरा पळत असताना त्यात देखील पडत आहेत. तर रात्रीच्या सुमारास अंधारात ही गुरे कळप च्या कळप मार्गाच्या मध्य भागी उभी अथवा बसलेली राहत असल्याने आपघात होत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील इंदापूर, कोलाड, खांब, सुकेली खिंड विशेषतः वाकणच्या पुलावर रस्त्यात गुरे उभी अथवा बस्तान मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला रात्रीच्या सुमारास धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी गुरांना मात्र वाऱ्यावर (मोकाटच) सोडली आहेत त्यावर कोण नियंत्रण ठेवणार.तर धनधांडग्याणी मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी विक्री केल्या त्यात कंपाऊंट त्यामुळे ही गुरे मुंबई- गोवा महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध बस्तान मांडून बसत आहेत.
————————————-
मुंबई-गोवा महामार्गावर भिरा फाटा, खांब,सुकेळी, तसेच विशेषतः कोलाड आंबेवाडी नाक्यावर बाजारपेठेत मोकाट गुरांचा कळप रस्त्यावर वाट अडवून थांड मांडून बसलेले असतात तर काही ठिकाणी उभे राहतात त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना गुरांचा प्रचंड त्रास होत आहे. गुरांच्या मालकांनी आपापल्या गुरांची काळजी घेणे आवश्यक आहे रस्त्यावर सोडू नये. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवासी दिलीप मोहिते यांनी सांगितले.
————————————-
या बाबत अनेकदा सदर ग्राम पंचायतीत तसेच पोलीस ठाण्यात या मोकाट गुरांबाबत उपाय योजना करण्यात यावी तसेच त्यांचे मालक कोण या बाबत माहिती दिली होती मात्र त्याकडे ग्राम पंचायत अधिकारी वर्ग कानाडोळा करत आहेत त्यामुळे आता हा अत्यंत गंभीर आणि प्रवाशी वर्गाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वाढते आपघात टाळण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ पुन्हा या बाबत संबधीत खात्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे सेनेचे उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading