आॅक्टोंबर महिना संपत आला तरी अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक दिवस सतत दुपारनंतर सुरू असलेल्या पावसाने ४ ते ५ दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. शनिवार दि.( २६) रोजी मुंबई -गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात सगळीकडे दाट धुक्याची चादर पसरली होती. त्याचप्रमाणे वातावरणात देखिल मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. परंतु या पहाटेच्या दाट धुक्यामुळे महामार्गावरील वाहतूक ही पुर्णतः धिम्या गतीने सुरू असल्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
धुक्याचे प्रमाण येवढे होते की वाहन चालवतांना ५ ते ७ फुट अंतरावरील समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी वाहने रस्त्याच्या बाजूला किंवा कुठे पार्किंग दिसेल त्या ठिकाणी उभी केली. धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा वाहतुक सुरू केली.
दरम्यान सकाळी व रात्री वातावरण थंड असते तर अनेक ठिकाणी धुके पहायला मिळते. दुपारी तर मोठ्या प्रमाणात हिट असते. वातावरणातील वारंवार होणाऱ्या या बदलांमुळे ताप, सर्दी, खोकला अशा साथींच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची योग्य अशी काळजी घेण्याचे आवाहन डॉ.प्रशांत रायबोले यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.