मुंबई गोवा महामार्गावर खांब नजिक भल्या मोठ्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा अपघात, गंभिर जखमी

goa-road-accident2
कोलाड (श्याम लोखंडे ) : मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड खांब मार्गावरील पुगाव जवळ पडलेल्या भयानक खड्यात बुधवारी रात्री आठ च्या सुमारास एका दुचाकी स्वराचा आपघात घडला यात दुचाकी स्वार गंभिर जखमी झाला असून दुचाकीचे खूप मोठे नुकसान झाल्याचे समजते.  सदरील खड्ड्यात कोणी प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का? व तद्नंतर हे खड्डे भरले जातील का ? अशी प्रवाश्यांना भीती निर्माण झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली तेरा वर्ष रखडले आहे तर मागिल मे महीन्यात इंदापूर ते वडखळ या मार्गावर करोडो रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले तर गेली पंधरा दिवस पडलेल्या पावसामुळे मोठा खड्डा पडल्याने रात्रीच्या सुमारास कोलाड कडून नागोठणे कडे प्रवास करणारा एक दुचाकी स्वराची दुचाकी सदरील खड्यात आपटत दुचाकी डिवायडरवर फेकली गेल्याने आपघात झाल्याने तो चिंताजनक असून दुचाकीचे खूप नुकसान झाले असल्याचे समजते तर वाहनचालकांसह प्रवाश्यांच्या जिवाला या खाड्यांमुळे धोका निर्माण झाला असुन सदरील खड्ड्यात कोणी प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का? अशी प्रवाश्यांना भीती निर्माण झाली आहे.
——————————————–
गेली तेरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे याची आता सर्व सामान्य माणसांनी तसेच कोकण वासियानी आत्म परीक्षण करण्याची वेळ आली आहे तर कोरोडो रुपये खर्च करून देखील महामार्गाची ही गंभिर समस्या आहे इंदापूर ते पळस्पे मार्ग हा अत्यंत धोकाायक बनला आहे त्यामुळे प्रवास करणे धोक्याचे झाले मोठ मोठे जीव घेणे खड्ड्यांमुळे अनेक वाहने अडकून बंद पडल्याने आपघात होत आहेत मागील दोन चार पाच दिवसांपूर्वी कोलाड पुई नजिक महीसदर नदीपात्र पुलावर खूप मोठा खड्डा पडला होता तिथे देखिल आपघात घडला होता त्याची दखल रोहा तहसीलदार यांनी घेत ताबडतोब तो खड्डा बुजविण्याचे आदेश दिले तदनंतर खड्डा भरला गेला परंतु कोलाड खांब दरम्यान याच खड्यांतून प्रवश्याना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पुगाव नजिक पडलेला खड्डा तसेच सदरचे खड्डे हे आपघात रोखण्यासाठी बुजविण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
……अलंकार खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते खांब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading