मागील दोन ते तीन महिन्यांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ झाल्याचे चित्र दिसत असतांनाच सुकेळी खिंडीजवळ खैरवाडी गावाच्या समोर अंत्यत धोकादायक वळणावरती ज्या ठिकाणी दोन महिन्यांपासून चार ते पाच अपघात झालेल्या ठिकाणीच रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास टॅकरला अपघात होऊन टॅक्कर चालक गंभीररित्या जखमी झाला.
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मुंबई -गोवा महामार्गा ६६ वरुन कोलाड बाजुकडुन मुंबईच्या दिशेने जाणारा टॅकर क्रं एम. एच. ४३ बी. जी. ६८३७ चालक नितिन कुमार यादव ( वय- २५) रा. लखनऊ, उत्तर प्रदेश याचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी सरळ दुभाजकावर धडकली.
चालक नितिन यादव हा टॅकरमधिल केबिनमध्येच बराच वेळ अडकुन होता. काही वेळानंतर रेस्क्यू टीम व क्रेनच्या सहाय्याने त्याला सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यास तेथुन जवळच असलेल्या जिदल रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल या ठिकाणी पाठविण्यात आले.
दरम्यान या अंत्यंत धोकादायक असलेल्या अपघातग्रस्त ठिकाणी अपघात रोखण्यासाठी काही तरी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी वाकण टॅबच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.