मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळ भीषण अपघात; डंपर-टेम्पोची धडक, एक गंभीर जखमी

Kolad accident tempo & truck
कोलाड (श्याम लोखंडे) :
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजिक भरधाव डंपरने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एकजन गंभीर जखमीं झाले आहे असून मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा अपघातांची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजिकच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंप समोर बुधवारी ७ में रोजी रात्री भीषण अपघात घडल्याने भरधाव डंपरने पीकअप टेम्पोला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असून सदरच्या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमीं झाल्याचे समजते तर दिवसेंदिवस मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा अपघातांची घटना घडत असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी साडे आठ च्या सुमारास भर पावसात ही घटना घडली पिकप टेम्पो क्रमांक एम.एच ०४ एच वाय १९६१ ही स्वता मुंबई गोवा हायवे बाजूने चालवित घेवून मौजे पूई गावचे हददीत इंडीयन ऑइल पेट्रोल पंपासमोर मुंबई गोवा हायवे रोडने जात असताना समोरून येणाऱ्या डंपर एम एच २० ईजी १२११ वरील चालक धर्मराज मुत्रीलाल कोल वय ३० वर्ष रा. केटीएल कंपनी खांब हा त्याचे ताब्यातील डंपर रस्त्याचे परिस्थितीकडे जाणारे वाहणाकडे दुर्लक्ष करून व धोकादायक पध्दतीने विरुद्ध भरधाव दिशेने चालवित येवुन पिकप वाहणाचे समोरासमोर येवून धडकला आणि अपघात करून अपघातात फीर्यादी यांना लहान मोठया स्वरुपाच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने एकजण गंभीर जखमीं झाला तसेच दोन्ही वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
सदरच्या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक एन.एम. मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून अधिक तपास तपासिक अंमलदार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading