मुंबई -गोवा महामार्गावर कोलाड नजीक धावती बस पेटली, बस जळून खाक, दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला

Bus Fire Kolad
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई गोवा महामार्गावर शनिवारी मध्यरात्री कोलाड नजिक लक्झरी धावती प्रवासी बस पेटली तर बस मधून प्रवास करणारे प्रवासी सुदैवाने बचावले असून कोणतेही जिवीत हानी झाली नाही परंतु बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.तर कोलाड नजिक कोकण रेल्वे पुलाखाली ही भयावह घटना घडली मात्र घडलेल्या घटने दरम्यान सुदैवाने कोणतेही रेल्वे गाडी न धावल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात होते तर घटनेमुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती तर घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रात्रौ बाराच्या सुमारास खासगी प्रवासी वाहतूक बसगाडी क्रमांक एम एच 47 ए एस 6003 मुंबई -बोरिवलीहून येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे जाणारी खापरोबा ट्रॅव्हल्सची खासगी बसला कोलाड नजिक कोकण रेल्वे पुलाजवळ अचानकपणे पाठच्या बाजूने जोरदार आवाज आला बस चालकाने ताबडतोब बस थांबवली व गाडीतील चाकलाचे साथीदार याने तत्काळ उतरून मागे जाऊन तपासले असता गाडीमध्ये आग लागल्याचे निदर्शनात आले, गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या तीस प्रवाश्यांना तसेच दोन चालक व दोन कर्मचारी यांनी तातडीने सर्वांना खाली उतरवण्यात आले.
जवळच असलेले पोलीस प्रशासन तसेच चंद्रकांत लोखंडे, विनायक लोखंडे, दादा धुमाळ, वनविभागाचे अधिकारी, शिक्षक गर्जे, आशिष वाणी व असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने सतर्क नागरिकाने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क साधला माहिती मिळताच *SVRSS TEAM धाटाव औद्योगिक अग्निशमन दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाली व लागलेल्या आगी वरती नियंत्रण आणण्यात आले. यामध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही परंतु गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे.तसेच आगीवर नियंत्रण होताच काही काळानंतर पोलिसांकडून पुन्हा सुरळीत वाहतूक सुरू करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल होत तत्काळ मदत कार्य सुरू केले तर घडलेल्या घटनेबाबत कोलाड पोलिस अधिकारी यांच्या वतीने अधिक तपास सुरू असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading