मुंबई -गोवा महामार्गावरील कोलाड चौकात रस्त्याला भलं मोठं भगदाड

Kolad Chauk Khdda
कोलाड (श्याम लोखंडे ) :
कोलाड आंबेवाडी नाक्यावरील नागरिकांना महामार्गाचे काम सुरू असताना कोणत्या ना कोणत्या समस्येना सामोरे जावे लागत आहे. तर द ग तटकरे चौकातील चक्क नवा बनविलेला मार्गालाच पडले भले मोठे भागदाडामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला असून मार्गावर काम करणारा ठेकेदार यांनी यांनी येथील ग्रामस्थ नागरिकांची थाटाची मांडली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील रोहा बाजुकडे जाणाऱ्या रहदारीच्या मुख्य चौकात गटाराच्या बाजूला रस्त्याला मोठे भगदाड पडला असुन या भल्यामोठया खड्ड्यात फोरव्हीलर स्वार जाता जाता सुदैवाने थोडक्यात बचावला असुन यामुळे ठेकेदारांनी केलेले काम किती? निस्कृष्ठ दर्जाचे आहे हे सिद्ध झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठरा वर्षांपासून सुरु आहे.अनेकवेळा या महामार्गाची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली व हे काम येत्या गणपती उत्सवापूर्वी पूर्ण होईल असे सांगितले आहे.परंतु फक्त “तारीख पे तारीख, यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही कारण हे जनतेने डिसेंबर २०१८ पासुन आजपर्यंत दिलेल्या डेडलाईनचे जाहीरतीचे फलक लावून सहा वर्षा पासुन महामार्गाचे काम न झाल्याचे पहिले आहे.

लोकांनेत्यांकडून फक्त अनेकवेळा मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली आहे परंतु निस्कृष्ठ दर्जाचे काम केलेला ठेकेदाराला कोणीही जाब विचारत नसल्यामुळे ठेकेदाराची मनमानी सुरु आहे असे दिसून येत आहे.  आंबेवाडी हे बाजारपेठेत भर रहदारीच्या चौकात गटाराच्या बाजूला पडलेल्या मोठया भगदाडावरून दिसून येत आहे. तसेच विविध ठिकाणी निस्कृष्ठ दर्जाचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कोलाड गोदी नदीवरील जुना पुल तसाच ठेऊन दोन्ही बाजूचे कठडे नवीन बांधण्यात आले आहेत तसेच वाकण जवळील गोडसई गावानजिक पुलाची अवस्था तशीच आहे. भुवन गावानजिक पुलाचा पत्ताच नाही तर कठडे अजूनही तुटलेल्या अवस्थेत आहेत.या महामार्गाचे काम वेगात करण्याच्या नादात अशी कामे सुरु असल्याची दिसून येत आहे.

————————————————-

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण्यासाठी पत्रकार, तसेच अनेक सामाजिक संघटना यांनी रस्तारोको करून आवाज उठवला.अनेकांच्या जमिनी कवळी मोलात खरेदी केल्या काहीना अद्याप पुरेसा मोबदला देखील मिळाला नाही.अनेक व्यावसायिक उद्योगधंदे बुडाले हातावर कमावणाऱ्यांची रोजी रोटी बुडाली त्यांना कोणतेही सबब न देता त्यांच्या दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आले. मग या कामाला १८ वर्षे उलटली अनेक मंत्र्यांचे पाहणी दौरे मार्गाच्या कामात दिवसेंदिवस बदल याला जबाबदार कोण हे काम पूर्ण होत नाही याला प्रशासनाचा नसलेला ठेकेदारावर नियंत्रण तसेच नियोजन शुन्य यामुळे अनेक वर्षे हे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुल सर्व्हिस रोड गटारे याचे भिजक घोंगड आजही प्रवासी वर्गाला धोकादायक ठरत आहे दररोज मार्गावर पडतात खड्डे तर आता तर चक्क भगडादच पडते तर कुठे गटारांवरील स्लॅब कोसळतो याला जबाबदार कोण ? सार्व.बांधकाम मंत्री मार्गाची पाहणी करून गेले दोन चार दिवस झाले नाही तोवर लगेच कोलाड आंबेवाडी नाक्यावरील द ग तटकरे चौकातील मेन मार्गावर भले मोठे भागदाड ही बाब चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे तरी संबंधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेऊन यावर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

… डॉ मंगेश सानप सामाजिक कार्यकर्ते कोलाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading