मुंबई गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने सरकारचा अंधाधूनी कारभार आणि ठेकेदाराची मनमानी दिवसेंदिवस मार्गालगत असलेल्या ग्रामस्थ नागरीकांना डोकेदुखी ठरत असल्याने अशा या ठेकेदाराच्या गलथान कारभारावर तळवली तर्फे दिवाली येथील ग्रामस्थ नागरिकांची गेली बारा वर्षे काम रखडल्याने मोठी हेळसांड होत असल्याने ते कमालीचे आक्रमक होत ठेकेदार विरोधात मोठा एल्गार करत बुधवारी २२ जानेवारी रोजी ग्रामस्थांनी गावाला जोडण्यात आलेला रस्त्याचे काम आदी करा नंतरच पुढील काम करा अन्याथा आमरण उपोषणाला बसणार असा इशारा होत होणार्या हेलसांड बाबत ठेकेदाराला दिला.
येथील ग्रामस्थांच्या अनेक समस्या मार्गावर ग्रामस्थांसाठी गेली अनेक वर्ष बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे तसेच ठिक ठिकाणी खोदून ठेवलेली माती बरा वर्षाहून अधिक काळ ग्रामस्थांना त्या धुळीला सामोरे जावे लागत आहे. आधीच्या ठेकेदारांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे अथवा काम करण्यासाठी वापरात आलेल्या साधनांमुळे काही घराना तडे गेले कौले फुटली या बाबत अनेकदा शासन दरबारी हेलपाटे मारावे लागले अद्याप त्याकडे कोणी जबाब दिला नाही कवडी मोलाच्या किंमतीत जागा जमिनी गेला त्याचा मोबदला देखील पुरेसा नाही स्थानिक आमदार, खासदार याकडे थुंकून ही पाहत नाहीत अनेक ठेकेदार आले गेले त्यांची मनमानी याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला या रखडलेल्या कामाबाबत पडला असल्याने आदी गावाला जोडला गेलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करा मग पुढील मार्गाचे काम करा असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी ठेकेदार याच्या विरोधात घेत आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी ग्रामस्थ प्रफुल घावटे,हभप नंदू महाराज तेलंगे, आशोक घावटे, जयश घावटे, उपसरपंच संजय तेलंगे, भाऊ तेलंगे, वैभव जैतपाळ, सुशील दपके, सुरेश घावटे, संतोष वडे, दत्तात्रेय वडे, सुरेश वडे,सुनील दपके, विठोबा पानसरे,दिंगबर घावटे, सौरव वडे, समीर तेलंगे,रमेश सुतार, नामदेव सुतार, प्रकाश चौधरी, चेतन पानसरे,आदी ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली सतरा वर्ष रखडले आहे तर या मार्गाची राज्यासह देशात तसेच जगभरात बोंब सुरू आहे तर किती सरकारं आली आणि गेली त्यात ठेकेदार ही दर वेळेला बदलले कोटयावधी रूपये खर्च झाले मात्र मार्ग काही होईना कोकण वाशीयांचा प्रवास काय सुखरकर होईना त्यात लगतच्या गावकरी ग्रामस्थांना रहदारीचे बनविण्यात आलेले पादचारी पुलांचे काम अर्धवट स्थितीत असल्याने त्या त्या ठिकाणी आपघाताला कारणीभूत ठरत आहेत तर अत्यंत खराब झालेली अवस्था त्यात धुळीवर मारण्यात येत असलेला पाण्याची फवारणी ही देखील दुचाकी चालकांना आपघाताचे कारण बनत आहे.
गेली अनेक वर्ष या मार्गाचे काम सुरू आहे अनेक ठेकेदार या कामात आले गेले मात्र येथील ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरले आहेत दिवसेंदिवस येथील ग्रामस्थांची होणारी हेळसांड याला जबाबदार शासन अधिकारी आणि ठेकेदार आहे बांधण्यात आलेल्या पादचारी पुळामुळे गावाला जोडला गेलेला डांबर रस्त्याचे व गटार लाईनचे अर्धवट अवस्थेत काम असल्याने अनेकांना धूळ मातीला गेली अनेक वर्षे सामोरे जावे लागत आहे दररोज हजारोंच्या संख्येने वाहणे या मार्गावरून जा ये करतात त्यातून प्रदूषित होणारी धूळ ही ग्रामस्थ नागरिकांच्या घश्या तोंडात व घरात जात असून ती प्रकृतीला हानिकारक ठरत असून आम्हा ग्रामस्थांचे एकच म्हणणे आहे की आदी गावाला जोडला गेलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करा मग पुढील कामाला सुरुवात करावी अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा असे सांगत मागणी संबधीत खाते व ठेकेदार यांच्याकडे केली जात असल्याचे ग्रामस्थ प्रफुल घावटे, जयश घावटे आदी ग्रामस्थांनी दिली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.