मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाबाबत सरकारला सूदबुद्धी देण्यासाठी कोलाड आंबेवाडी येथे जन आक्रोश समिती यांच्या वतीने होळी पूजन तिचे दहन करत बोंब ठोकत मार्गाचे काम लवकरात लवकर होऊन आमच्या कोकणातील चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शांततेत होळी मातेकडे गुरुवारी १३ मार्च रोजी सायंकाली सात वाजता प्रार्थना केली.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम मागील १७ वर्षांपासून रखडले असून महामार्गाच्या कामासाठी दरवर्षी सरकार नवनवीन डेडलाइन देत आहे. खोके सरकारच्या या ढिसाळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी होळीच्या दिवसाचे औचित्य साधून काही ठीक ठिकाणी आंदोलन करत सांगा कधी महामार्ग पूर्ण करणार की फक्त आश्वासनच देणार, असा जाब विचारत जनआक्रोश समिती आणि शेकडो रायगडकर सरकारच्या नावाने बोंब ठोकत होळी मातेचे पूजन करत दहन करून होय महाराजा म्हणत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारच डोक ठिकाणावर येण्यासाठी त्यांना रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सरकारला सूदबुद्धीसाठी जन आक्रोश समिती यांच्या वतीने शांततेत जन आंदोलन करत होळीचे दहन करत प्रार्थना करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे, महेंद्र वाचकवडे,संदीप माने,गणेश शिंदे,संजय कुर्ले, विठ्ठल घोणे,पणदरेकर बुवा सुरेश शिंदे, बाळा शिंदे, अविनाश म्हसकर,सुतार,यांच्या सह आंबेवाडी नाक्यावरील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
२०११ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र महामार्गावरील ठिकठिकाणी बायपास, उड्डाणपूल, सर्व्हिस रोड, गटारे,मोऱ्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या महामार्गावर मागील १४ वर्षांत ५ हजार ६१ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार २२९ जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.
यामुळे जनतेतील रोष व्यक्त करत जनआक्रोश समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मेन चौकात शिमगा करत ‘शिमगा उत्सव’ होळीचे दहन करून आक्रोश समितीला कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा देत महामार्गाच्या कामाची डेट लाईन फेल म्हणून होळी पेटवून कोकणातील चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी साकारकडून लवकरात लवकर या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होऊदे यासाठी प्रार्थना करत सरकारला सूदबुद्धी दे अशी मागणी होळी आई कडे केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.