मुंबई-गोवा महामार्गाची अतिशय भयानक अवस्था

goa-road-nidi
सुकेळी ( दिनेश ठमके ) : मुंबई -गोवा महामार्गावरील रस्त्याची अवस्था ही अत्यंत भयानक झाली असुन अक्षरशः रस्त्यावर महाभयंकर खड्डे पडल्यामुळे रस्त्याची पुर्णपणे चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरुन वाहन चालवणे मोठी डोकेदुखी ठरत आहे. खड्डयांतुन वाहने चालवत असतांना वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांनासुद्धा सांधेदुखी व मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
goa-road-khaddaa
यावर्षीचा पाऊस सुरु होण्यास थोडा विलंब झाला. त्यातच महामार्गावरील रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी खुपच उशीरच होत चालला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यापासून महामार्गावरील नागोठणे ते कोलाड या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था रस्त्यात‌ खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हे समजायलाच मार्ग नाही एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
goa-road-khadda1
रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये भर पावसातच जेसीबी च्या सहाय्याने नुसतीच खडी टाकण्याचे काम सद्यपरिस्थितीत चालु आहे. पंरतु ही खडी टाकून जे खड्डे भरले जातात ती खडी २ ते ३ तासातच खड्डयातुन बाजुला उडुन गेल्यामुळे पुन्हा खड्ड्यांची अवस्था पहिल्यासारखीच जैसे थे होते. याच खड्ड्यांमुळे अनेक वाहने रस्त्याच्या मधोमध बंद पडत असल्यामुळे महामार्गावर अनेकवेळा वाहतूक कोंडी देखिल होत आहे. तर अपघांताचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसुन येत आहे.
goa-road-1
तसेच वाहनांचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाहनांचे टायर वारंवार पंक्चर होत असल्यामुळे गाड्या दुरुस्त करणारे मेकॅनिकसह टायरवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्याचप्रमाणे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात सांधेदुखी व मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे अशा आजारांवर उपचार घेण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
garej

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading