मुंडे कुटुंबाकडून कर्जत सराई वाडीतील आदिवासी शेतकऱ्यांची फसवणुक करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे.दरम्यान पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता या धनदांडग्या सोबत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याकडून करण्यात आला.सदर जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता मुंडे कुटुंबाकडून थेट शेतकऱ्यांनाच धमकी दिली जात असून परस्पर जागा विक्रीचा व्यवहार सुरू केल्यानेच शेतकरी आक्रमक झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेली मौजे सुगवे सराई या आदिवासी वाडीतील जागा सर्वे नंबर 65 /2 अ क्षेत्र 7– 42– 0 आकार तीन ही 18 एकर जागा मिळकत परशुराम पदुसराई आणि आलो लक्ष्मण सराई यांची वडिलोपार्जित आहे. दरम्यान मुंबई मालाड गोविंद नगर येथे राहणारे मूळचे बीड जिल्ह्यातील शशिकांत बाबुराव मुंडे आणि अमोल शशिकांत मुंडे या वडील आणि मुलाने शेतकरी परशुराम पदुसराई यांना मिळकतीचे वारसा मध्ये जागेत वाटप करून देतो म्हणून सदर आदिवासींना फसवून खोटे कागदपत्र तयार करून बेकायदेशीरपणे ही जागा स्वतःच्या नावे करून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान आजही ही जागा शेतकरी वारसाहक्काने नावे असल्याने त्यांच्या ताब्यात असून या जागेवर शेतकरी वर्षाकाठी भाताची लागवड तसेच नाचणी, वरई ,भाजीपाला, फळ पिके लागवड करीत आहेत.
मात्र या जागे बाबत शेतकरी कुल कायद्यानुसार कुटुंब प्रमुख मोठा मुलगा पदू विकास सराई यांच्या नावाची नोंद झालेली असताना काही अडचणींमुळे दुसरा मुलगा गोमा भिका सराई यांची नावाची नोंद राहून गेले होते. सदर जागेवर नाव नोंदवून देण्याच्या उद्देशाने आलेले मुंबई स्थित शशिकांत बाबुराव मुंडे यांनी सन 2016 मध्ये शेतकऱ्यांना आपल्या स्वखर्चाने जागेवर नाव नोंदवून देतो या बहाण्याने कर्जत तहसील कार्यालयात नेले होते. शेतकऱ्यांचा अज्ञान पणाचा फायदा घेत एका कागदावर शेतकऱ्यांचे अंगठे देखील घेतले होते.
दरम्यान आता मुंडे यांनी अचानक शेतकरी कसत असलेल्या शेतीवर दावा करीत शेतकऱ्यांनाच अडवणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. शिवाय शेतीची जागा NA प्लॉट न करता त्याचे तुकडे करून परस्पर विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना फसवून जागेच्या सातबारावर कुळ कायदा कलम 32 ग चा दावा दाखल करून मुंडे यांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुळ कायदा दावा क्रमांक 25/ 2016 दाखल करून शेतकऱ्यांच्या नावे फक्त 0-42-0 एवढ्या मिळकतीवर नावे ठेवण्यात आलेली आहे.
मुंडे यांनी आपले नाव जास्तीत जास्त क्षेत्र असलेल्या सात ह्या मिळकतीवर नोंदवली आहे. याही पलीकडे जावून मुंडे यांनी वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्याचा घाट घातला असताना वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
एकूणच आता शेतकरी पीक घेत असलेल्या जागेवर मुंडे यांनी शेतकऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली आहे, पोलिसांचा धाक दाखवून जागा हडपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.एकीकडे जागे संदर्भात आमची लढाई ही न्यायालयात सुरू असताना दुसरीकडे धनदांडगे आमच्याच जागेवर येवून आम्हाला दमदाटी करीत शिवीगाळ करीत असल्याचे शेतकरी सांगतात शिवाय बीडचे मुंडे ओळखत नाही का म्हणून धमकावत असल्याचा आरोप होतो.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.