पेण :
पेण सुधागड मतदार संघातील शेतकऱ्यांचे, भूमिपत्रांचे, बाळ गंगाधरण प्रकल्पग्रस्तांचे, एम एम आर डी ए, एमआयडीसी प्रकल्पा करिता सक्तीचे जमीन अधिग्रहण या समस्या सोडविण्याकरिता मी कटिबद्ध असून या मतदारसंघात रोजगार, पाणी, रस्ते यासारखे मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत त्या सोयी सुविधा प्राथमिकतेने मिळवून देणार आहे. मी स्थानिकांना न्याय मिळवून देण्याकरिता निवडणूक लढवीत असल्याने विविध समाज व संघटनांचा मला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अतुल म्हात्रे यांनी पेण येथे शेकाप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या सोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकलसह पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, पेण खारेपाट भागतील पाणी प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविणार, एमआयडीसी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळऊन देण्यासाठी आणि त्यांची होणारी पिळवणूक दुर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आणि तो प्रश्न देखील एका वर्षात सोडविण्यात येणार, सेझ बाधित जमीन जी आजही रिलायन्सच्या ताब्यात आहे ती येत्या दीड ते दोन वर्षात पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात मिळऊन देणार, येथील स्थानिकांना त्यांच्या न्यायाहक्काचा जो रोजगार आहे तो मिळऊन देणार, स्थानिक समाजाला जो दुय्यम आणि दुर्बल स्थान दिला जातो त्या भूमिपुत्रांना न्याय मिळऊन देणार, या मतदार संघात ज्या रोजगाराच्या योजनाच आखण्यात आल्या नाहीत अशा नैसर्गिक मतदार संघात मेडिकल, ऍग्रो सारखे टुरिझम उभारून येत्या साडेतीन वर्षात लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती करणार, गणपती कारखानदारांसाठी त्यांना प्रोत्साहन देऊन क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अमलात आणणार, आदिवासी वाड्या वस्त्यांवर येत्या साडेतीन वर्षात एक हजार घरकुले उभारणार, बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे समान न्याय मिळऊन देण्यासाठी कटिबध्द राहणार, मुंबई – गोवा महामार्गाच्या विशेष करून सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विशेष लक्ष देणार यांसारखे या मतदार संघातील प्रश्न हाताळण्याचे काम येत्या पाच वर्षात करण्याची ग्वाही अतुल म्हात्रे यांनी दिली. आपण जरांगे पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचे अतुल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.