“मी उद्योजक होणारच”: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य उद्योजकता कार्यक्रम

Mee Uddyojak Honarach
मुंबई (शांताराम गुडेकर) : 
मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. मराठी भाषा केवळ साहित्यापुरती मर्यादित न ठेवता ती उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपली जागा निर्माण करत आहे.
आजच्या युगात मराठी माणूस केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, यासाठी “मी उद्योजक होणारच” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), मुंबई येथे मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे.
यामध्ये यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन: कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामांकित उद्योजक, स्टार्टअप फाउंडर्स आणि गुंतवणूकदार (इन्क्युबेटर्स) उपस्थित राहून मराठी तरुणांना मार्गदर्शन करतील. स्टार्टअप संधी आणि व्यवसाय वृद्धी: नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीवर चर्चा होईल.नेटवर्किंग संधी: नवोदित आणि अनुभवी उद्योजकांना परस्पर सहकार्याची आणि व्यवसाय वृद्धीच्या संधी मिळतील.फंडिंग आणि गुंतवणूक: नवीन स्टार्टअपसाठी आर्थिक मदतीच्या संधी आणि गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधण्याची संधी.
मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात उतरण्याची गरज का आहे?
आज भारतात स्टार्टअप इकोसिस्टम वेगाने वाढत आहे. परंतु मराठी तरुण अजूनही नोकरीच्या सुरक्षिततेकडे जास्त कल दाखवत आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून माहिती तंत्रज्ञान, कृषीउद्योग, उत्पादन क्षेत्र, सेवा उद्योग, ई-कॉमर्स, अन्न प्रक्रिया उद्योग, निर्यात-आयात व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांत मराठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर संधी घेतल्या पाहिजेत.
“मी उद्योजक होणारच”  प्रमुख मार्गदर्शक
या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, शंभूराज देसाई, नितेश राणे तसेच इतर नामवंत उद्योजक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विनायक पात्रुडकर यांना जीवनगौरव तसेच प्रसाद लाड यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.तसेच अजित गोरुले (अध्यक्ष – कुणबी उद्योजक लॉबी )यांचाही गौरव करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम मराठी तरुणांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून महाराष्ट्र कल्चर क्लब हा त्याचा माध्यम प्रयोजक आहे. कार्यक्रमाचे आयोजक निलेश मोरे, संतोष पाटील, उदय सावंत, जीवन भोसले असून कार्यक्रमात सहभागीसाठी 📞 ७४००११९४३६ / ९८१९८४३१४८ या नंबरवर संपर्क करा. किंवा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक ओपन करून आपला फॉर्म भरा.
https://forms.gle/Kw9aJJitHHZrX6QD7
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी:
व्हाट्सअप ग्रुप लिंक : https://chat.whatsapp.com/BcS4yzcIkQjFBn4pW8mEAq
“उद्योजकतेकडे वळा,स्वावलंबी बना आणि मराठी भाषा तसेच महाराष्ट्राचा अभिमान वाढवा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading