मिशन 100 राजपत्रित अधिकारी’अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचं बक्षीस वितरण

Poladpur Prashna Manjusha
पोलादपूर (शैलेश पालकर) :
पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाने आयोजित केलेल्या ‘मिशन 100 राजपत्रित अधिकारी’ या उद्दीष्टांतर्गत तोंडी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा आणि बक्षीस वितरण पोलादपूर शाळा क्रमांक 1 येथे झाले. शिक्षकांनी आयोजित केलेली यू टयूब लाईव्ह भव्य स्पर्धा पोलादपूरकरांच्या कौतुकाचा विषय झाली आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
पोलादपूर तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी बौध्दीक तयारी करणे आणि राजपत्रित अधिकारी तयार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून या स्पर्धेचे उदघाटन बांधकाम व्यावसायिक रामदास कळंबे यांच्याहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गुलाबराव सोनावणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रविण निकम लिखित ‘डिप्रेशन व जीवनात सकारात्मक व्हा’ या पुस्तकांचे तर प्रदिप वरणकर लिखित ‘यु टू कॅन स्पीक कॉन्फीडंटली’ या पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी दीप्ती गाट, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंके, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम, रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, शिवराम उतेकर, माजी मुख्याध्यापिका अस्मिता तलाठी, विद्यामंदिर पोलादपूरचे मुख्याध्यापक रविंद्र साळुंखे, शिक्षक नेते सोपान चांदे, विजय पवार, विस्तारअधिकारी शिवाजी महाडिक, समन्वय समिती अध्यक्ष परशुराम मोरे, माध्यमिक शिक्षक दीपक सकपाळ, ओंकार मोहिरे, द्वारकानाथ गुरव, साधनव्यक्ती मंगेश चिले, पोलादपूर नं. 1च्या मुख्याध्यापिका सरिता कदम, कन्याशाळा पोलादपूरच्या मुख्याध्यापिका निवेदिता जाधव आदी उपस्थित होते.
स्पर्धेत मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. याप्रसंगी अमोल मोरे, सचिन चौधरी, लक्ष्मण आखाडे, नारायण कुंडले यांनी गुणलेखक तर अजय येरुणकर, विकास पवार, संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून स्पर्धेत उत्कंठा वाढविली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे तसेच आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे दिली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोबत लेखी परीक्षेतून सुपर टॉप 20 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच काही विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
तोंडी परिक्षेत इयत्ता 1 ते 5 गटात अवनी संतोष जाधव शाळा मोरगिरी व युक्ता संतोष शिंदे शाळा फौजदारवाडी मोरगिरी या जोडीने प्रथम, अवनी प्रभू गावंडे शाळा गोळेगणी व स्वरांजली अविनाश रुबदे शाळा परसुले यांनी द्वितीय तर ॠदित्य पंकज निकम व दिपश्री दिपक बिरादार शाळा भोगाव खुर्द यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर इयत्ता 6 ते 8 गटात वेदांत रंगनाथ पवार व मनोज राधाकिसन नाईकनवरे शाळा विद्यामंदिर पोलादपूर या जोडीने प्रथम, ज्ञानेश्वरी धनंजय दवंडे व साची संतोष शेलार माध्य.विद्या. कापडे यांनी द्वितीय, तर श्रेयस संदिप साळुंखे जि.प.शाळा लोहारे व श्रुती सुनिल साळुंखे माध्यमिक विद्यालय लोहारे या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रश्नमंजुषा समिती अध्यक्ष अनंत गोळे, समीर सालेकर, विकास मांढरे, सचिन दरेकर, संतोष शेलार, संदिप सकपाळ, सचिन सालेकर, राजू पार्टे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग मोरे यांनी तर प्रास्ताविक मनोज सकपाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading