‘मिशन पोलादपूर तालुक्यातील शंभर राजपत्रित अधिकारी’ व पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाचा अभिनव उपक्रम

'मिशन पोलादपूर तालुक्यातील शंभर राजपत्रित अधिकारी' व पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाचा अभिनव उपक्रम
पोलादपूर (शैलेश पालकर) :
पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ यांच्यामार्फत मिशन पोलादपूर तालुक्यातील 100 राजपत्रित अधिकारी या अभिनव उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी प्रश्नमंजुषा परीक्षा विद्यामंदिर पोलादपूर येथे घेण्यात आली. या परिक्षेत 730 विद्यार्थ्यांमधून सर्वोच्च गुण मिळवणारे दोन गटातून प्रत्येकी 20 विद्यार्थी निवडण्यात आले.
या परीक्षेसाठी एकूण 730 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. सदर परीक्षा इयत्ता पहिली ते पाचवी एक गट व इयत्ता सहावी ते आठवी दुसरा गट अशा पध्दतीने घेण्यात आली. पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ यांनी प्रकाशित केलेल्या प्रश्नमंजुषा या पुस्तकावर आधारित सदर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून दोन्ही गटातून सर्वोच्च गुण मिळवणारे प्रत्येकी 20 विद्यार्थी निवडण्यात आले. लवकरच विद्यार्थ्यांची पुन्हा तोंडी परीक्षा होणार आहे.
या परीक्षेत गट 1 ते 5 मध्ये मधुरा कोलवडकर- लोहारे, ॠदित्य निकम-भोगाव खुर्द, अवनी जाधव- मोरगिरी, अमेय धालपे-फौजदारवाडी कापडे, रुद्र पवार-चोळई, साईराज सोडनवार-रानवडी, दिपश्री बिरादार-भोगाव खुर्द, नेत्रा कदम-भोगाव खुर्द, आराध्य चिकणे-ओंबळी हायस्कूल, तेजल बामणे-सडवली,सानवी ढेपे-दिवील, स्वरांजली रुबदे-परसुले, स्वरा पवार-सानेगुरुजी विद्यालय लोहारे, समर्थ जाधव-चोळई, आरोही सोनावणे-जनसेवा, सोनाक्षी दळवी-सडवली, स्वरुप देवे-दिवील, अवनी गावंडे-गोळेगणी, युक्ता शिंदे-फौजदारवाडी मोरगिरी, मयन भिलारे-दिवील.
गट 6 ते 8 मध्ये वेदांत पवार-विद्यामंदिर पोलादपूर, ज्ञानेश्वरी दवंडे-माध्य.विद्या. कापडे, मनोज नाईकनवरे-विद्यामंदिर पोलादपूर, श्रुती साळुंखे-माध्य. विद्यालय लोहारे, चेतना शिंदे-फौजदारवाडी मोरगिरी,अनिकेत मांगले-रानवडी बु., आर्यन कोळेकर-सानेगुरुजी विद्यालय लोहारे, प्रांजल भोये-जनसेवा विद्यालय, आनंदी भंडलकर- सानेगुरुजी विद्या. लोहारे, अथर्व जगताप-शाळा सडवली, श्रेयस साळुंखे-शाळा लोहारे, श्रावणी भिलारे शाळा दिवील, अर्जुन दरेकर-जनसेवा विद्यालय, ओमकार शिंदे-शाळा फौजदारवाडी मोरगिरी, सतिश ढवळे-शाळा चिरेखिंड, साची शेलार-माध्य. विद्या. कापडे, कल्पेश पिंजारी-माध्य. विद्या. कापडे, सानवी पवार-सानेगुरुजी विद्या. लोहारे, आर्या सलागरे-सानेगुरुजी विद्या. लोहारे, सम्यक जाधव-शाळा परसुले यांची गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली.
या परिक्षेसाठी डॉ. गुलाबराव सोनावणे, डॉ. दिव्या सोनावणे, उद्योजक रामदास कळंबे, विस्तार अधिकारी सुभाष साळुंके, शिवाजी महाडिक, रामदास उतेकर, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष सोपान चांदे, विद्यामंदिर मुख्याध्यापक रविंद्र साळुंके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सडवलीच्या शिक्षिका प्राजक्ता मोरे व  प्रश्नमंजुषा समितीचे अध्यक्ष अनंत गोळे, प्रदीप वरणकर, समीर सालेकर यांनी रहिवासी शिक्षक संघ व प्रश्नमंजुषा समिती सदस्यांना सोबत घेऊन उत्कृष्ट नियोजन केले. या अभिनव उपक्रमाचे पालक वर्गाकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading