
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
कर्जत तालुक्यातील आतिदुर्गम भाग असलेल्या कुरूंग गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजय केंद्रे या शिक्षकाने शाळेची पट संख्या सात असल्यामुळे चुकीच्या पध्दतीने शासन जिआर पुढे करत बंद केलेली शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी कुरूंग ग्रामस्थ यांचा सुरू असलेला पाठपुरावा व या साठी आमदार महेंद्र थोरवे यांचे लाभलेले सहकार्यामुळे शिक्षकाच्या आडमुठी धोरणामुळे बंद करण्यात आलेली कुरूंग येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा शिक्षणअधिकारी यांच्या आदेशानी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुंग शाळा अजय केंद्रे या शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने बंद केली असल्याची माहिती गावातील ३-४ पालकांना माहित होती परंतु इतर ग्रामस्थांना याबाबत काहीच माहिती नसल्याने. सदर शाळा बंद झाल्याची माहिती दिनांक ५ ऑगस्ट, २०२४ रोजी पप्पू गायकवाड या शिक्षकांच्या माध्यमातून युवा समाज प्रबोधनकार अविनाश भोईर यांना समजताच अविनाश भोईर यांनी मराठी शाळा सगळीकडे बंद होत असल्या तरी दुर्गम भागातील शाळा जर बंद झाल्या तर आदिवासी, गोर गरीब जनतेच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं नाही का? अस प्रश्न उपस्थित होत असल्याने, शाळे संदर्भात माहिती जमा करून गावातील मुलांचे पालक गीता गणेश भोईर, अरुण अण्णा पाटील, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संभाजी तरे, पोलीस पाटील चंद्रकांत भालेराव, अन्य काही ग्रामस्थांचे सहकार्य घेत पाठपुरावा सुरू केला.
या पाठपुरावयाला पप्पू गायकवाड व दिनेश जोशी यांचे मार्गदर्शन हे अविनाश भोईर यांना लाभल्याने ८ते ९ वेळा शाळा चुकीच्या पद्धतीने बंद केलेली आहे ती सुरू करावी यासाठी धावपळ करत पंचायत समिती कर्जत येथे गट शिक्षणाधिकारी, गटविकासाधिकरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दीले परंतू कारवाई होत नसल्यामुळे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कडे सदर विषय गेला असता, आमदार थोरवे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत रायगड जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले की कुरुंग शाळा चुकीच्या पद्धतीने अजय केंद्रे या शिक्षकाने बंद केली आहे. ती तात्काळ सुरू करा. असे आदेश दिल्या नंतर शिक्षणाधिकारी यांनी घटनेचे गांभीर्य व सत्यता पडताळून पाहिल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांना सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर, २०२४ रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानुसार स्वतः गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, विस्तार अधिकारी पादिर, मोहन पाटील, केंद्र प्रमुख म्हात्रे, अशोक म्हसे, बागुल , कुरूंग गावचे युवा व्याख्याते अविनाश भोईर, पोलीस पाटील चंद्रकांत भालेराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी तरे आदी शिक्षक, पालक, विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानण्यात आले.
परंतु अशा या मुजोर आणि बेजबाबदार शिक्षकावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सार्या नागरिकांचे लक्ष.
—————————————
राज्यातील सर्व शाळा १५ जून मध्ये सुरू होतात. मात्र कुरूंग येथील रा. जि. प्रा. शाळा पट संख्या ७ असल्याने व शिक्षक अजय क्रेंदे यांनी पोषण आहाराचे कारण सांगत पालकांच्या सह्या घेत व शिक्षण व्यावस्थापक कमिटी व ग्रामपंचायतीला विश्ववासात न घेता व शिक्षण व्यावस्थापक कमिटी अध्यक्ष संभाजी तरे यांची स्व अक्षरात खोटी सही करून शाळा बंद करण्याचा प्रस्ताव पाठला आहे. तर शाळा बंद होणार असे समजल्याने दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी नांवे कमी केली असता, नांव कमी केलेले दाखले पालकांना न देता. वारे रा. जि.प्रा. केंद शाळा येते परस्पर अजय क्रेंदे यांनी दाखल केले, शाळा बंद करण्याचा प्रकार हा शिक्षक अजय क्रेंदे यांनी निव्वळ स्वतःच्या बदलीसाठी केला आहे.
अविनाश भोईर, युवा समाज प्रबोधकार तथा शिवक्रांती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, कर्जत तालुका अध्यक्ष,