मार्गाचीवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा

मार्गाचीवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) : 
 युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा कार्यान्वयित जल संजीवनी प्रकल्प, कर्जत अंतर्गत जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ०८ मार्च २०२५ रोजी पाथरज ग्राम पंचायत येथील मार्गाचीवाडी गावात उत्तम कामगिरी करणाऱ्या स्वयं सहायता गटांचे सत्कार ‘सन्मान चिन्ह’ देऊन करण्यात आले. युनायटेड वे मुंबई हि संस्था रोपवाटिका, हर्बल फिनायील उत्पादन,शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम उत्पादन, गांडूळखत निर्मिती प्रकल्प,शिवणकाम अशा विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवीत आहे. उपक्रम राबविण्यामागचा उद्देश हा महिला स्वयं सहाय्यता समूहच्या माध्यमातून फक्त बचती पुरते मर्यादित न राहता व्यवसायाभिमुख प्रशिक्षित करून रोजगार निर्मितीद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. 
महिला दिनाच्या कार्यक्रमात आदिवासी दुर्गम भागातील पाथरज,खांडस, अंभेरपाडा आणि वारे ग्रामपंचायत मधील एकूण १७ गावातील ३१ गटातील २१० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या प्रसंगी पोलीस स्टेशन नेरळ येथील पी.एस.आय.माननीय प्राची पांगे मॅडम, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) अलिबाग येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी.दिक्षा मॅडम तसेच खादी ग्राम उद्योग पर्यवेक्षक लतिका कवडे ह्या मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.प्राची मॅडम यांनी महिलाना स्वसंरक्षण व कायदे संबंधित मार्गदर्शन केले, तर लतिका मॅडम यांनी रोजगाराभिमुख विश्वकर्मा योजनेविषयी तसेच महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली.
दिक्षा मॅडम यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत महिलांसाठी रोजगाराभिमुख योजना आणि त्या संबंधित प्रशिक्षणबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रिया मॅडम यांनी युनायटेड वे मुंबई संस्था आणि त्याअंतर्गत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प विशेषतः जलसंजीवनीची माहिती दिली. तर आरोग्य सेविका पुष्पा राठोड यांनी महिलांचे आरोग्य विषयी माहिती दिली. या प्रसंगी गटातील महिलांनी रोपवाटिका, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, शिवणकाम, किचन गार्डन व एकत्रित भाजीपाला उत्पादन आणि विक्री याविषयीचे आपले अनुभव आणि आर्थिक नफा या विषयी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला बचत गटातील सदस्य अरुणा ऐनकर आणि गायत्री ऐनकर यांनी केले.      
राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान कर्जत विभागाच्या समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person) असलेल्या नीलम जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यशोदा ऐनकर,अंकिता जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन सोशल एक्स्पर्ट विवेक कोळी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम लीडर मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली समूह सखी संजना पादीर, फिल्ड ऑफिसर अमर पारधी, दीपक कवठे, प्रमोद धादवड व वरिष्ठ कृषि तज्ज्ञ जोएब दाऊदी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading