अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागात विधानसभा निवडणुकीसाठी या भागातील मतदारांचा मापगाव, बहिरोळे, मुशेत, सोगाव, चोंढी, किहीम येथील मतदान केंद्रावर दिवसभर समिश्र प्रतिसाद पाहायला मिळाले.
भातशेती तयार झाली असल्याने शेतीकामाला जाण्यापूर्वी काही प्रमाणात शेतकरी व नोकरदार व इतर कामगारवर्गाने सकाळीच आपले मतदानरुपी कर्तव्य पार पाडले, तर काहींनी दुपारनंतर गर्दी केली होती. सोगाव विभागात सकाळी जास्त तर दुपारी काही प्रमाणात गर्दी कमी झाली असल्याचे दिसून आले, तसेच दुपारी तीन नंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. नवमतदार यांनी आपले पाहिले मतदान मोठ्या उत्साहात केले.
यावेळी नवमतदारांसह स्त्री व पुरुष मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, यांना रांगेत उभे न करता त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत होते. तर महिला व पुरुष मतदारांची वेगवेगळी रांग केल्याने सर्वांनाच रांगेत जास्त वेळ लागला नाही.
मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी यांनी सर्व मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करत आपले कर्तव्य चोख पार पाडले. एकंदरीतच भागातील मतदान शांततेत पार पडले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.