माथेरान नगरपालिका हद्दीमधील रेल्वे अधिकारी विश्राम गृहातील आऊट हाऊस मध्ये शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी एक इसम संशयास्पद अर्ध मेलेल्या अवस्थेत असल्याचे माथेरान पोलिसांना कळविले. त्याअनुषंगाने माथेरान पोलीस ठाण्याचे स. पो. नि.अनिल सोनोने यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, राजेश रामदास, पोलीस हवालदार अशोक राठोड पोलीस शिपाई दामोदर खतेले, वैभव बारगजे यांनी घटनास्थळावर धाव घेत सुशांत गजगे या युवकाला माथेरान बि. जे. हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविले मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली मिसाळ यांनी सुशांत हा मृत झाल्याचे कळवले. यानंतर पोलिसांची तपासाची यंत्रणा फिरवली या रेल्वे विश्राम गृहात सुशांत सोबत काम करत असलेल्या (स्वयंपाकी) तसेच (हेल्पर ) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
सदर घटना गुरुवार दि.13 रोजी रात्री साडेदहा अकराच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत असून त्या ठिकाणी दारूच्या नशेत दिनेश तिवारी, प्रेम किशोर वाल्मीक तसेच मयत सुशांत गजगे यांच्यात हाणामारी झाल्याचे देखील समजते, या रेल्वे विश्रामगृहातील हा कर्मचारी वर्ग राहत असलेल्या आऊट हाऊस मध्ये देखील पोलिसांना रक्ताचे डाग निदर्शनात आले असून यातील दिनेश तिवारी याच्या डोक्याला व तोंडाला जखमा दिसत आहेत. तिवारी व गजगे यांच्यात झालेल्या वादातून गजगे याचा धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आला असून त्याचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांची टीम अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.