माथेरान बचाव समितीने शिवसेना आणि भाजप नेत्यांची घेतली भेट! विविध विकासात्मक चर्चा

Ravindar Chavhan
माथेरान (मुकुंद रांजणे) : 
 माथेरान बचाव समितीने शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि पुरंदर हवेली विधानसभेचे संपर्क प्रमुख अनिल घोने यांची भेट घेत माथेरानच्या ई रिक्षा संदर्भात चर्चा केली आहे. यावेळी शिवसेना माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव यांनी 94 ई रिक्षाला परवानगी मिळावी म्हणून मागणी लावून धरली असून माथेरान दस्तूरी नाका येथे घोडे व्यवसायिकांकडून पर्यटकांची होणारी लूट थांबविण्यासाठी चर्चा केली. दरम्यान या समितीने भाजप पनवेल आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची ही भेट घेत माथेरानच्या विकासात्मक प्रश्नावर चर्चा केली आहे. याबाबत प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. 
 ई रिक्षा स्टॅन्ड हटवून घोडे व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी परस्पर निर्णय घेतला होता. यावरून माथेरान बचाव समिती आमदार थोरवे यांच्या विरोधात आक्रमक झाली होती. यावेळी महायुतीतील भाजप कार्यकर्त्यांनी थेट उघड नाराजी दाखवत राजीनामे देण्याची भाषा पक्षश्रेष्ठींकडे केली होती.आमदार थोरवे यांची ढवळाढवळ आम्ही माथेरान कर खपवून घेणार नाही अशा शब्दात खडेबोल देखील सुनावण्यात आले होते. दरम्यान यावरून माथेरान शहर बाचाव समितीने आपल्या स्थरावर पक्ष श्रेष्ठींशी संपर्क साधला. माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी बेलापूर येथील शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि याठिकाणी उपलब्ध असणारे पुरंदर हवेली विधानसभेचे संपर्क प्रमुख अनिल घोने यांच्याशी चर्चा केली आहे.
माथेरान शहरात सध्या 20 ई रिक्षा सुरू असून 74 ई रिक्षेला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि उर्वरित 74 ई रिक्षाला परवानगी मिळावी म्हणून चर्चा झाली.त्याच सोबत माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक ही घोडे व्यवसायिकांकडून केली जात आहे. यावर ही आपण तोडगा काढावा म्हणून सांगण्यात आले आहे. यावेळी माथेरान शहरात शिवसेना संघटनात्मक बांधणी करून वाढवण्यासाठी चर्चा झाली आहे लवकरच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मी माथेरान येथे येणार असल्याचे रायगड संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले.
 दरम्यान आज माथेरान बचाव समितीत असलेले भाजप कार्यकर्ते यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर चर्चा केली आहे.यावेळी महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे.याशिवाय माथेरान ई रिक्षा सोबत,माथेरान येथे रोपवे, फर्निकुलर या पर्यायी मार्गाची मागणी केली असून माथेरानच्या विकासात्मक धोरणावर चर्चा करण्यात आली आहे. याबाबत प्रशांत ठाकूर यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचा आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading