निसर्ग मित्र संघटनेचे सर्वेसर्वा राकेश कोकळे यांनी विधान परिषदेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांची दि.१४ रोजी मुंबईत भेट घेऊन पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील माथेरान शहरात प्लास्टिक चा जागोजागी खच पडलेला असतो गेली अनेक वर्षे राकेश कोकळे व त्याचे मित्र माथेरानच्या दूरवर परिसरातील प्लास्टिक गोळा करीत असतात व सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.
येथे दर वर्षी दहा ते बारा लाख पर्यटक भेट देतात जवळपास आठ लाख पाण्याच्या प्लास्टिकच्या बोटल्स पर्यटक येथील जंगलात फेकून देतात. नगरपालिकेचे कर्मचारी इतक्या प्रमाणातील प्लास्टिक गोळा करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे माथेरानला प्लास्टिकच्या पाण्याच्या बोटल्सवर बंदी घालणे हाच एकमेव पर्याय दिसत असल्याने राज्य सरकारने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी म्हसे यांनी माथेरानला प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता मात्र अंमलबजावणी झाली नाही.
आमदार मनीषा कायंदे यांनी आगामी अर्थसंकल्प अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असून माथेरान प्लास्टिक मुक्ती साठी सरकार द्वारे ठोस उपाययोजना करण्यासाठी भाग पाडू अशी ग्वाही दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.