माथेरान ( मुकुंद रांजाणे ) :
माथेरान मध्ये सर्वत्र होळीचा सण आनंदाने साजरा करण्यात आला.गावात जवळपास पन्नास पेक्षाही अधिक होळ्या उभारण्यात आल्या होत्या.सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महिलांनी होळीला नैवेद्य दाखवून पूजाअर्चा करत आनंदाने होळी साजरी केली.
महिलांनी गाणी गाऊन तसेच लहान लहान मुलांनी नाचून होळीतील टाकलेले नारळ काढण्यासाठी लगबग सुरू होती.पर्यावरण पूरक होळी साजरी करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
रविवार सुट्टीचा दिवस असताना सुध्दा इकडे पर्यटकांची संख्या अत्यंत तुरळक असल्याने लॉज धारकांचा पूरता हिरमोड झाला होता.