माथेरानमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग

Shivasena Matheran
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :  
शिवसेनेच्या उबाठा गटाचे अधिक प्राबल्य असणाऱ्या प्रभाग १ मधील इंदिरा गांधी नगरातील बहुधा सर्वच कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यासाठी दि.२७ रोजी सायंकाळी हॉटेल सेसीलमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे उबाठा गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. प्रत्येक प्रभागातील उबाठा गटाचे कार्यकर्ते स्वखुशीने शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.
उबाठाच्या वरिष्ठांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिलेल्या पक्षाच्याच उमेदवाराला पाठींबा न देता अपक्ष उमेदवाराला पाठींबा जाहीर केला होता. आणि त्यासाठी आपल्या पदांचे राजीनामे सुध्दा मेलद्वारे वरिष्ठांना पाठविले होते. माथेरान मधील  नेत्यांच्या या दुहेरी भूमिकेमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती.
नेते जर का स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करून आपल्याला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी अग्रेसिव्ह असतील तर आम्हाला सुध्दा आमच्या वाटा मोकळ्या आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेश वेळी दिल्या.
माथेरान मधील इंदिरा गांधी नगर येथील अधिक प्राबल्य असणाऱ्या ह्या प्रभागातील उबाठा च्या समस्त कट्टर कार्यकर्त्यांनी तसेच गावातील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा पक्षप्रवेश केला.
यावेळी तुकाराम आखाडे, लक्ष्मण( आण्णा) कदम,दिलीप सपकाळ, लक्ष्मण शिंगाडे,बाबू ढेबे, अनिकेत आखाडे, अजय बिरामने, ऋषिकेश बिरामने, भारत बिरामने,लहू आखाडे,जनार्दन गोरे,रामचंद्र ढेबे,बाबू पाटील,सिद्धेश घाग,अमर शिंदे,झीमा आखाडे, अमोल आखाडे, ललित पांगसे,संतोष आखाडे,वसंत ढेबे, सलीम (घारू) मुजावर तसेच पंचवटी नगरातील प्रवीण चौघुले, तुषार बिरामने, यांसह बाजारपेठ मधील संदीप कदम,भुषण शिंदे, प्रतीक ठक्कर आदींनी पक्षप्रवेश केले.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, उप शहरप्रमुख प्रमोद नायक,संपर्क प्रमुख निखिल शिंदे,जेष्ठ सदस्य योगेश जाधव, राकेश कोकळे आदी उपस्थित होते.
——————————————————
आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे हात बळकट करण्यासाठी अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. निश्चितच यावेळी शिंदे गटाकडे गावातील अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भरणा ज्याप्रकारे दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे इथून निर्णायक मते महेंद्र थोरवे यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
…योगेश जाधव, जेष्ठ शिवसैनिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading