माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
लोकसभेच्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवारांकडून आपला कार्यभाग साधून एकाच उमेदवाराच्या पारड्यात काहीशी मते टाकून आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा अविर्भाव आणताना काही पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने अग्रेसिव्ह होते.दिलेल्या फंडाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणारे काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असोत किंवा नव्याने पक्षप्रवेश केलेले हौशे, नवशे असोत ही मंडळी नको त्या ठिकाणी पक्षाबाहेरील मतदारांना की जे प्राप्त झालेल्या शुल्लक रक्कमेचा कुठेही गाजावाजा करणार नाहीत अशांना निधीचा पुरवठा केला जातो आणि जे खरोखरच पक्षासाठी एकनिष्ठ राहून आपल्या उमेदवाराचा आत्मीयतेने प्रचार करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कायमस्वरूपी विरोध घेत आहेत त्यांची अवस्था निवडणुकीनंतर खूपच बिकट झालेली पाहावयास मिळत आहे.
इथे अशी काही राजकीय मंडळी अस्तित्वात आहेत की ज्यांना पक्षाशी काहीएक स्वारस्य नसून दोन्हीही उमेदवारांशी संगनमत करून आम्ही आपल्यासाठी जीवाचे रान करून मताधिक्य मिळवून देऊ अशी स्वप्ने दाखवून ज्या उमेदवारांना इथल्या राजकीय घडामोडी बाबतीत सुतराम कल्पना नाही ती उमेदवार मंडळी यांच्यावर विश्वास ठेवून भरमसाठ रक्कम सुपूर्द करतात.माथेरान मधून भरघोस मते मिळवून देऊ यासाठी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत ठेऊन संख्याबळ दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने हे उमेदवार सढळ हाताने निधी देत असतात.
लोकसभेच्या निवडणूक वेळी सुध्दा दोन्हीही उमेदवारांना अंधारात ठेऊन मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल केल्याचे खात्रीलायक समजते. अत्यंत माफक मतदार संख्या असलेल्या या गावात प्रमुख पक्षांना जेमतेम एक हजारांच्या आसपास मते प्राप्त होऊ शकतात.त्यासाठी उमेदवारांकडून वीस ते पंचवीस लाख रुपये उकाळून स्वतःचीच दिवाळी साजरी करण्यात येथील नेहमीचीच राजकीय मंडळी पारंगत आहेत.खोटा आव आणून उमेदवारांची मने जिंकण्यात अशी नाटकी मंडळी खूपच पटाईत आहेत.
तर अनेक मांडवा खालून जाऊन आलेले काही पक्षाचे प्रतिनिधी सुध्दा ज्यांच्यासाठी वेगळी चूल मांडून बसले होते तेच पुन्हा एकदा आर्थिक लाभ घेण्यासाठी एकाच मांडवाखाली येत असल्याने गावात चर्चला उधाण आले आहे.स्वतःची नीतिमत्ता बाजूला ठेवून ज्या पक्षामुळे आपल्याला सर्व क्षेत्रात स्थान आहे याचा विसर पडलेला दिसत आहे नैतिक जबाबदारी पूर्णपणे विसरुन पक्षाशी सुध्दा काही घेणेदेणे नसल्याप्रमाणे वावरताना दिसतआहेत यामुळे सर्वसामान्य मतदार बुचकळ्यात पडला आहे की कुणावर विश्वास ठेवून पुढील नगरपरिषदेच्या निवडणूक काळात कुणाला सभागृहात पाठवावे याच विवंचनेत दिसत आहेत.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या गुप्त सुत्रधारांनी इथल्या संपुर्ण पार्श्वभूमीचा अभ्यास केल्यानंतरच निवडणुकीचा निधी स्वतःच्या हाताने मतदारांना वाटप करावा अन्यथा इथल्या जेमतेम मतांसाठी लाखो रुपयांचा चुराडा सहन करण्याचे धैर्य त्यांनी बाळगावे त्यामुळेच उमेदवारांनी माथेरानला विधानसभेचा निवडणूक फंड द्या पण सांभाळून ?असे सूर सर्वसामान्य मतदारांकडून सातत्याने ऐकावयास मिळत आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी PEN न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. PEN न्यूज या माहितीचं समर्थन करत नाही)