
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल होणे हे अतिशय महत्त्वाचे असून सरसकट वाहन बंदी कायद्यामध्ये शिथिलता असणे गरजेचे असून इरसालवाडी सारखी घटना घडल्यास ताबडतोब मदत कार्य मिळण्याकरिता जेसीबी सारख्या वाहनांना येथे परवानगी असणे ही आता काळाची गरज बनलेली आहे.
दहा दिवसांपूर्वी माथेरान जवळील डोंगर माथ्यावरील इरसालवाडी येथे दरडी खाली येऊन संपूर्ण गाव उध्वस्त झाला होता त्यातील 57 जणांचा अजूनही पत्ता लागलेला नाही जर का या ठिकाणी शासनाने गावकऱ्यांच्या मागणीला मान्यता देऊन उपाययोजना केल्या असत्या तर मृत्यूचा आकडा निश्चितच कमी झाला असता या ठिकाणी कोणतेही वाहतूक व्यवस्था नसल्याने मदत कार्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते जेसीबी सारखी अद्यावत यंत्रणा या ठिकाणी पोचले असते तर निश्चितच मृत्यूचा आकडा कमी झाला असता.
परंतु या घटनेपासून आता बोध घेण्याची गरज निर्माण झाली असून माथेरान सारख्या सरसकट वाहन बंदी कायदा असलेल्या ठिकाणी याचा विचार होणे गरजेचे आहे अशी घटना माथेरान मध्ये घडल्यास तात्काळ मदत मिळण्याकरता अशा वाहनांना येथे परवानगी मिळायलाच हवी येथील कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे असून नागरिकांना सेवा मिळेल त्याकरता प्रशासनाने आता ठोस भूमिका घेण्याची गरज आहे सध्या माथेरान मध्ये जोरदार पाऊस होत असून प्रशासन ही अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्याकरता ठीक ठिकाणी भेटी देत आहेत. परंतु त्या आवश्यक सेवेमध्ये अशा वाहनांची गरज भासल्यास त्याच मात्र माथेरान मध्ये परवानगी नाही त्यामुळेच तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी माथेरानला अशा वाहनांची गरज असल्याने परवानगी मिळणे गरजेचे आहे.
माथेरान कर अनेक वर्षांपासून येथील वाहन बंदी कायदा मध्ये बदल व्हावा याकरता प्रयत्नशील आहेत परंतु शासन दरबारी त्यास यश येत नाही परंतु आता संपूर्ण कोकण रायगड विभागाला पावसाने घेरले असताना या कायद्यात बदल घडवून माथेरानला अत्यावश्यक सेवा म्हणून जेसीबी व मदतकार्य उपयोगी पडतील अशा वाहनांना तत्पुरत्या स्वरुपाची तरी परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
—————————————————-
माथेरानच्या कुशीत वसलेल्या हाशाची पट्टी या आदिवासी वाडीच्या ठिकाणी दि.२८ रोजी सायंकाळी माथेरान पालिका प्रशासनाने भेट देऊन त्यांना स्थलांतरित होण्यास सांगितले आहे या ठिकाणीही वाहन व्यवस्था नाही त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून संपूर्ण गावाला माथेरान मध्ये स्थलांतरित होण्याच्य सूचना प्रशासन केल्या आहे.