
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानमध्ये वाल्मीकि जयंती येथील वाल्मीक बांधवानी मोठया उत्साहात साजरी केली.
नगरपरिषद कार्यालयात महान तपस्वी श्री वाल्मीकींच्या प्रतिमेस सेवानिवृत्त कर्मचारी संतोष चव्हाण ,शोभना चव्हाण यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून यांनी प्रतिमेचे पूजन केले.
अखिल भारतीय कामगार मजदूर संघाचे अध्यक्ष संतोष लखन यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बाबासाहेब आम्बेडकर यांचे प्रतिमेस रामचंद्र चव्हाण यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
वाल्मीकि बंधूंनी वाल्मीक नगर येथे सर्वांनी मिळून एकत्रित मंदिरात पुजा केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, युवा सेनेचे अध्यक्ष गौरंग वाघेला यांनी दर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल चव्हाण, अक्षय लखन, दक्ष सोळंकी, साहिल लखन, गौरव लखन, हर्ष सोळंकी, राहुल चव्हाण,पिंकेश, तरुण चव्हाण, विव्हान चव्हाण, वरुण सरसार, यश पुरबिया,समीर शिंदे,चिंतामणी आदींनी परिश्रम घेतले.