जग एकविसाव्या शतकात जात असताना माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून पूर्वापार चालत आलेली मैला उचलण्याची प्रथा आजही कायम असल्याने पर्यटकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पूर्वी पाच दशकांपूर्वी माथेरान या पर्यटनस्थळी उघडी डब्यांची शौचालय अस्तित्वात होती. त्यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांमार्फत डब्ब्यात साठलेला मैला मनुष्यबळाचा वापर करून नेत असत. कालांतराने शौचालयाला सेफ्टी टॅंक बांधण्यात आल्यामुळे हा सर्व मैला या टॅंक मध्ये साठला जायचा त्यांनंतर हे सांडपाणी कड्यात ड्रेनेज लाईन द्वारे सोडले जात होते. तर रस्त्यावर पडलेली घोड्यांची विष्ठा ( मैला) आजही नगरपरिषदेच्या कामगारांमार्फत उचलण्यात येत आहे. हा सर्व मैला सफाई कामगार डब्ब्यात भरून अडगळीच्या ठिकाणी अथवा डंपिंग ग्राउंडवर जमा करत आहेत. ही दुर्गंधीयुक्त कामे करताना कामगारांना गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मैल्यामुळे श्वसनाचे आजार, दमा, हातपाय दुखणे तसेच अन्य आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. पूर्वी इथली लाल तांबडी माती एखाद्या सौभाग्याप्रमाणे माथेरानच्या मस्तकावर शोभून दिसत होती. परंतु पर्यटक वाहून नेणाऱ्या घोड्यांची संख्या जवळपास पाचशेच्या आसपास असून मालवाहू घोड्यांची संख्या सुध्दा त्याहीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या सर्व घोड्यांच्या विष्ठेने हीच तांबडी माती पिवळसर होऊन एकप्रकारे या पर्यटन स्थळाला वैराग्याचे रूप प्राप्त झाले आहे.
काही वर्षांपूर्वी इथे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आल्याने रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे पिवळसर माती दिसून येत आहे. टपाल पेटी पासून पुढे दस्तुरी नाक्यापर्यंत पूर्णपणे रस्त्यांची साफसफाई नियमितपणे केली जात नाही त्यामुळे ही लिद मिश्रित माती रस्त्याच्या दुतर्फा साठलेली असते. नगरपरिषदेने सफाई कामगारांमार्फत नियमितपणे ही स्वच्छता करून घेतल्यास सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. त्यासाठी येथील प्रशासकीय राजवटीत नगरपरिषदेच्या पुढाकाराची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
——————————————————-
नगरपरिषदेच्या ताब्यातील मागील वर्षीच्या सात ई रिक्षा धूळ खात पडून आहेत. सनियंत्रण समिती कडे पाठपुरावा करून यातील काही रिक्षा मैला वाहून नेण्यासाठी उपयोगात आणल्यास सफाई कामगारांचे श्रम काहीअंशी वाचण्यासाठी मदत होईल. त्यासाठी नगरपरिषदेची मानसिकता असणे गरजेचे आहे.
——————————————————-
दिवाळीच्या अगोदरच पालिका कर्मचारी विशेष पथक नेमून साफसफाई करणार आहेत.
…राहुल इंगळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.