प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन सोहळा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी सव्वानऊ वाजता अधीक्षक कार्यालय येथे अधीक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर नगरपालिका कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
असेंबली हॉल येथे कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे, वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळा येथे सुभेदार कै. विनय विनय धनावडे यांच्या शिल्पास नगरपरिषदेचे सावंत आणि उप शिक्षक संतोष चाटसे यांच्या शुभहस्ते पुष्पहार त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास लेखापाल अंकुश इचके यांचे शुभहस्ते पुष्पहार, वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास करुणा बांगर यांच्या शुभहस्ते पुष्पहार, स्वातंत्र्य सैनिकांचे स्तंभास कर निर्धारण अधिकारी समीर दळवी यांच्या शुभहस्ते पुष्पहार विर हुतात्मा भाई कोतवाल यांचे निवासस्थानी मेघा कोतवाल यांचे शुभहस्ते ध्वजारोहण, हुतात्मा स्मारक येथे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण, हुतात्मा स्मारक येथे वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी रूपाली मिसाळ यांचे शुभहस्ते पुष्पहार, हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल स्मारक येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या नाम फलकास नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर सदगीर यांच्या शुभहस्ते पुष्पहार, हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या शिल्पास लेखापरीक्षक भारत पाटील आणि प्रवीण सुर्वे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमानंतर नगरपरिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी नागरिक,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.