तीनही ऋतूंमध्ये कशाची तमा न बाळगता वार्ता संकलन करण्यासाठी पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात वेळप्रसंगी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून जनतेच्या हितासाठी नेहमीच झटताना दिसतात.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार लोकाभिमुख प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांचा निपटारा करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात त्यांचे आरोग्य सदृढ असावे यासाठीच येथील माथेरान प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आज येथील बीजे रुग्णालयात रायगड प्रेस क्लबचे सहसंघटक मिलिंद कदम यांच्या पुढाकाराने जेष्ठ पत्रकार मुकुंद रांजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानचे मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे,माथेरानच्या आरोग्य अधिकारी डॉ.रुपाली मिसाळ,डॉ.रॉय सर्व हॉस्पिटल कर्मचारी तसेच माथेरान नगरपालिका कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे, प्रवीण सुर्वे ज्ञानेश्वर सदगीर, लेखापाल अंकुश इचके, स्वच्छता विभाग नरेंद्र सावंत अभियंत्या करुणा बांगर यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडले.
यावेळी पत्रकार मिलिंद कदम,मुकुंद रांजणे,गिरीश पवार, चंद्रकांत सुतार, संजय भोसले, संतोष खाडे यांसह अन्य उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.