माथेरान ( मुकुंद रांजाणे ) :
माथेरान रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या घावरे हॉटेल आणि घावरे दूध डेअरीच्या कंपाऊंड मधील जवळपास दोनशे वर्षे जुने असणारे नांदरूक जातीचे भल मोठं झाड दि.२६ रोजी सायंकाळच्या दरम्यान कोसळले.
सुदैवाने यावेळी मुख्य रस्त्यावरून पादचाऱ्यांची वर्दळ नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी सुद्धा या हॉटेल आणि डेअरीच्या कंपाऊंड मधील टेबल आणि खुर्च्या त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड पूर्णपणे पडलेले आहे. यामध्ये पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे असे हॉटेलचे व्यवस्थापक शकील पटेल यांनी सांगितले.
यावेळी घटनास्थळी वनसमितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी धाव घेऊन घडलेल्या वस्तुस्थितीचा पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी पाठविला आहे. नगरपरिषदेच्या कामगारांमार्फत हे झाड काढण्यात आले आहे.