कर्जत ( गणेश पवार ) :
कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगर जंगल परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा येकदा बघावयास मिळत आहे. येथील बिबट्याने शेतकऱ्याच्या रानात चरण्यासाठी गेलेल्या म्हशीच्या पारडाचा फडशा पाडला आहे. त्यामुळे माथेरान डोंगर जंगल परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणाऱ्या कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगररांगेच्या कुशीत धनगर टप्पा म्हणून ओळखली जाणारी धसवाडी वसलेली आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असलेली अतीदुर्गम भागात वसलेली ही नागरी वस्ती असून, येथे मोठ्या प्रमाणत दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी राहत आहे. दरम्यान येथे राहणारे शेतकरी धोंडू धाऊ आखाडे यांच्या म्हशी या नेहमीप्रमाणे मंगळवार १७ डिसेंबर रोजी माथेरान डोंगराचे रानात चरण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. मात्र यातील एका म्हशीचे पारडू घरी परतले नसल्याने याचा शोध घेण्यासाठी गेलेले शेतकरी आखाडे यांना म्हशीचे पारडू हे अर्धवट खालेल्ल्या अवस्थेत मृत भेटले असल्याने, जंगलातील हिंस्र प्राणी बिबट्याने यावर हल्ला केल्याचा संशय यावेळी शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच माथेरान वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान बिबट्याच्या दाहशतीमुळे येथील नागरिकांनी भीती व्यक्त केली असून, वन विभागाने या बिबट्याच्या बंदोबस्त लवकरात लवकर करावा म्हणून मागणी लावून धरली. तर माथेरानच्या या सह्याद्रीच्या डोंगर कुशीत परिसरात काही महिन्यापूर्वी रेल्वे लाईन मध्ये उभा असलेल्या बिबट्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने, माथेरानच्या जंगल परिसरात खुलेआम फिरणाऱ्या बिबट्यामुळे सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या संदर्भात वनविभागाकडून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बिबट्याचे फोटो संदर्भात अधिकृत अशी कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याने, ही माहिती फेक असल्याचे देखील चर्चा होती. मात्र आता शेतकऱ्याच्या या घटनेने पुन्हा एकदा बिबट्याची दहशत समोर आली असून, माथेरानच्या डोंगर जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान माथेरान घाटात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांसाठी आता ही चिंतेची बाब बनली असून, वनविभागाकडून काही जंगल परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बिबट्या बाबत माहितीचे बॅनर झळकावून सूचना देखील करण्यात आल्याची माहिती वनविभाकडून देण्यात आली आहे.
——————————————————
वन विभागा कडून घटनास्थळाची पाहणी व पंचनामा करण्यात आला असुन, पशुवैद्यकीय अधिकारी यांना प्राचारण करून, सदर मृत पारडूचे शवविच्छेदन करण्यात आले असुन, प्राप्त अहवाळनुसार नुकसान भरापाईसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे सदर प्रकरण सादर करण्यात येईल, व या अधी ही अशा प्राणी हल्ल्यातील मृत जनावरांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर माथेरान डोंगर भागात एका बिबट्याचा वावर असुन, नागरिकांनी सतर्क राहावे. जंगलात चरण्याकरीत सोडलेली नागरिकांनी आपली जनावरे ही सुर्यास्ताच्या आत घरी परत आणावी. तसेच माथेरान डोंगर भागात वसलेल्या वाडी वस्तीतील नागरिकांनी संध्याकाळनंतर लहान मुलांना घराचे बाहेर सोडू नये, तसेच स्वच्छसाठी रात्रीचे एकटे घराबाहेर पडू नये असे नागरीकांचे काळजी हितार्थ वनविभागाक मार्फत आव्हान करण्यात येत आहे.