माथेरान हे ब्रिटिश कालीन मुंबई पुणे पासून अगदी जवळचे छोटेसे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी ब्रिटिश राजवटी पासून वीज पाणी नगरपालिका सारख्या सुविधा पुरविण्यात आल्या होत्या या आजही सुरू आहे. परंतु या सुविधा आता ठेकेदार कर्मचाऱ्यांवर विसंबून असल्याचे चिन्ह माथेरानमध्ये दिसत आहे. सरकारी नोकरीतून सेवा मुक्त झाल्यानंतर येथे पुन्हा भरती होत नाही तर त्या जागी ठेकेदारीतून कर्मचारी नियुक्त केला जात असल्याने माथेरान मधील शासकीय कार्यालय आता बहुतांश ठेकेदारीच्या कर्मचाऱ्यांवरच अवलंबून असल्याचे चित्र सर्वच खात्यात दिसून येत आहे.
माथेरानमध्ये नगरपालिका कार्यालयामध्ये बहुतेक पदेही रिक्त असून त्यांची कामे पाहण्याकरता ठेकेदारी पद्धतीवर नियुक्त केलेल्या लोकांवर विसंबून राहावे लागते अनेक जण येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागा भरल्या गेल्या नाही त्यामुळे येथे अधिकारी उपलब्ध नसल्यास त्या जागी ठेकेदार कर्मचारी उपस्थित असल्याने अनेक वेळा नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागत असते, माथेरान मधील नगरपालिकेच्या माध्यमातून सफाई कामगार बांधकाम विभाग नगरपालिका कार्यालय त्याचप्रमाणे प्रवासी कर सारख्या अनेक विभागांमध्ये 140 होऊन अधिक कर्मचारी ठेकेदारी द्वारे नियुक्त्या करून त्यांच्या मार्फत काम पाहिले जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती केल्यामुळे येथील स्थानिक तरुणांना नगरपालिकेमध्ये नोकरीचा वावच राहिलेला नाही.
येथील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा असणार आहे पाणीपुरवठा विभागांमध्ये सध्या बावीस कर्मचारी हे ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केले गेले आहेत. जे वॉलमन फिल्टर हाऊस व इतर ठिकाणी कार्यरत आहेत तर येथे कायम सरकारी नियुक्त कर्मचारी हे बोटावर मोजणे इतकेच आहेत. त्यामुळे या ठिकाणीही ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेल्या तरुणांना अति अल्प वेतनावर नोकरी करावी लागत आहे. येथे कोणतेही नोकरीचे साधन नसल्याने या तरुणांना नाईलाजाने या पद्धतीने नोकरी करावी लागत आहे.
येथील वीज वितरणामध्येही अशीच परिस्थिती असून अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या विभागात एक अभियंता व आठ कर्मचारी सध्या कार्यरत आहे त्यातील चार कर्मचारी हे कायमस्वरूपी असून चार कर्मचारी ठेकेदारी पद्धतीवर नियुक्त करण्यात आलेले आहेत. वीज विभाघात काम करणे हे अतिशय जोखमीचे असते कारण पोल वरती चढणे चालू 22 23 धावा बरोबर काम करणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखेच आहे, परंतु नाईलाजामुळे या कर्मचाऱ्यांनाही ठेकेदारी पद्धतीवर येथे काम करावे लागत असते त्यामुळे त्यांच्याकडूनही सेवेत कायम व्हावे अशी मागणी होत असते.
मात्र अनेक ठिकाणी ठेकेदारी पद्धतीने अशीच कामे होत असल्याने नवीन भरत्या बंद झालेले आहेत ज्याचा फटका येतील सुशिक्षित तरुणांना होत आहे व बेकारी वाढत आहे याचा फायदा मात्र ठेकेदारांना होत असतो याच वेतनावर कायमस्वरूपी काम करण्याची कर्मचारी तयार असताना देखील ठेकेदारांना ठेके देऊन या गरजू तरुणांना अल्प वेतनामध्ये काम करावे लागत आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी खात्यामध्ये कार्य करत असल्याने ठेकेदारी कर्मचारी शासकीय कामे करताना पहावयास मिळत असतात ही फार मोठी चिंतेची बाब आहे, त्यामुळे यावर निर्णय होणे गरजेचे असून शासकीय कार्यालयांना ठेकेदारी मुक्त करणे हे आता शासनाच्या हातामध्येच आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.