हिचे वडील माणिकरावांना तीन वेळा पाडलेय ही काय चीज आहे. असे म्हणणाऱ्या विरोधी आमदारांना माणिकरावांची कन्या काय चीज आहे, येत्या 20 तारखेला मतदार जनताच दाखवून देईल. गेल्या तीन वेळा तुमच्या डोक्यावर बाळासाहेबांसह मातोश्रीचा हात होता म्हणून निवडून आलात. यावेळी तुम्ही गद्दारी केलीत. याच कारणास्तव जनता तुम्हाला घरात बसवेल, असे घणाघाती प्रत्युत्तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप कामत यांनी दिले.
पोलादपूर शहरातील गांधी चौकामध्ये कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली असता महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप बोलत होत्या.
पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील संपर्क कार्यालयापासून सुरू झालेल्या मतदार संपर्क रॅलीतून महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन करून पोलादपूर शहरातील मतदार जनतेला मशाल निशाणीवरच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी रॅलीमध्ये महाडचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा जाधव, माजी सभापती दिलीप भागवत, शैलेश सलागरे, माजी राजिप सदस्य अनिल नलावडे व मुरलीधर दरेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदमाकर मोरे, युवानेते धनंजय देशमुख, चेतन पोटफोडे, माजी नगराध्यक्ष अश्विनी गांधी, निलेश सुतार, बच्चू पवार, माजी नगरसेविका शुभांगी चव्हाण, विद्यमान नगरसेवक गायकवाड, श्रावणी शहा, गरूड, स्वप्नील भुवड व निखील कापडेकर, माजी सरपंच अमोल भुवड, गोळेगणी सरपंच शेखर येरूणकर, धामणदिवी सरपंच क्षमता बांद्रे, काटेतळीचे माजी सरपंच शंकर वाडकर, कोतवालचे माजी सरपंच महेश दरेकर, कापडे बुद्रुकचे माजी सरपंच व तालुका संघटक अजय सलागरे, संजय जगताप, सुरेंद्रआण्णा चव्हाण, जगदीश पवार, अमरदीप नगरकर, मदार शेख, धामणकर तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी व तरूण तरूणी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्नेहल जगताप कामत यांनी, विकास कामांच्या गप्पा करताना 3600 कोटींच्या विकासकामे आणल्याचा दावा करणाऱ्या विरोधी उमेदवारांना विकास कुठे झाला हे विचारण्याची योग्य वेळ म्हणजे मतदान असल्याचे सांगून यांचे पगारी कार्यकर्ते जेव्हा बोलण्यात कमी पडतात तेव्हा पगार कमी झाला काय असा प्रश्न पडतो, अशी उपहासात्मक भाषा केली. महिलांना लाडकी बहिण संबोधायचे आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करायचा अशी परिस्थिती राज्यात असल्याचे सांगून स्नेहल जगताप कामत यांनी जगताप कुटूंबियांना निष्ठेची भाषा शिकवू नका, ज्यांनी 50 खोक्यांसाठी निष्ठा विकली त्यांना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकारच नसल्याचे खडसावून सांगताना स्वर्गीय माणिक जगतापांचे काम गावागावांत झाले असल्याने आजही त्यांची मुलगी म्हणून मतदार जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने मशाल हाती घेऊन महिषासुर मर्दिनी आली आहे ती महिषासूराला संपविणारच असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप कॉर्नर सभेमध्ये आक्रमणपणे बोलत असल्याने उपस्थित तरूणवर्ग व जनसमुदाय अतिशय उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन दाद देत होता.
प्रारंभी पोलादपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांनी, महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी पोलादपूर शहरामध्ये स्वच्छतागृह किंवा आरोग्यविषयक सुविधा उभारण्यास कमी पडलेले नेतृत्व मताधिक्याच्या वल्गना करीत असल्याचे सांगून किमान पाचशे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा जाधव यांनी, विकासकामाच्या खोटया बाता मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावाशेजारी महिलावर्गाला पिण्याच्या पाण्याची सोय करून देता आली नसल्याचे सांगितले.
माणिकरावांच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन स्नेहल जगताप यांनी महाड शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करण्यासाठी कंबर कसण्याची भूमिका निश्चितच जनतेबद्दलची आपुलकी दाखविणारी असल्याचे सांगितले. पोलादपूरच्या पहिल्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी यांनी स्नेहल जगताप यांच्यामुळे या मतदार संघात प्रथमच प्रथमच महिला उमेदवार मिळाल्याने महिलांनी मतदान मोठया संख्येने करावे असे आवाहन केले.
माजी सभापती कांचनताई बुटाला यांनी, स्नेहल जगताप धडाडीची उमेदवार असल्याचे सांगून महिलांनीच नव्हे तर पोलादपूर तालुक्यातील सर्वांनीच मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. युवा सेनेचे चेतन तथा बंटी पोटफोडे यांनी, साडेतीनशे कोटींचा विकास केल्याचे विरोधी उमेदवार सांगतात पण आम्हाला विकास दिसला नाही, दिसला तो विकास गोगावले हेलिकॉप्टरमधून फिरताना दिसला, अशी उपरोधिकपणे टीका केली. यावेळी युवानेते धनंजय देशमुख यांनी, शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नांव चोरणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेलादेखील न्याय देण्यापासून विलंब करण्यास भाग पाडले आहे.
शिवसेना कुणाची तर ठाकरे यांचीच हे बच्चा बच्चा समजून आहे. मशालीचे बटन दाबून स्नेहल जगताप यांना विजयी करताना शिवसेना कोणाची हेदेखील देशाच्या न्यायव्यवस्थेला सांगण्याची गरज असल्याचे सांगितले. स्नेहल जगताप कोण, असा निजामपूर भागात काल बोलणाऱ्यांना स्नेहल जगताप नाम सुनके फ्लॉवर मत समझना फायर है फायर, असा निरोप देण्याची गरज आहे.
पोलादपूर शहरातील महाबळेश्वर रोड, बाजारपेठ, शिवाजीनगर गाडीतळ, जुना महाबळेश्वर रस्ता तसेच शहरातील अंतर्गत वाडया वस्त्यांमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप कामत या स्वत: कार्यकर्त्यांसमवेत मतदारांना मशाल चिन्हावर मतदानाचे आवाहन करीत फिरत असताना ज्येष्ठ वयोवृध्द व्यापारी, महिला तसेच नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पोलादपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळाराम मोरे, मधुकर ग.शेठ, शिरिष साबळे यांचेदेखील त्यांनी आशीर्वाद घेतले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.