रायगड (अमुलकुमार जैन) :
महाराष्ट्र राज्याची सार्वत्रिक विधान सभा निवडणूक होऊन महायुतीची सत्ता राज्यात आली. त्यानंतर सत्ता स्थापन सुद्धा झाले त्यानंतर दोन अधिवेशन होऊन देखील आजपर्यंत रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळालेले नाही. रायगड जिल्हा हा सद्यस्थितीमध्ये पालकमंत्री विना पोरका असलेल्या अवस्थेत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगी तुरा सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यातच दोन्ही कडून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकमेकावर चिखलफेक करण्याची संधी सोडताना दिसत नाही.
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार अदिती तटकरे यांचा आज 16 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसदिवशी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावर रायगड जिल्ह्याच्या फिक्स पालकमंत्री अदिती तटकरे असा उल्लेख केल्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालकमंत्री पदाची नक्की बाजी कोण मारणार ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांची नावे जाहीर केली होती.त्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री 18 जानेवारी रोजी रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्याचे झाल्याचे जाहीर करताच रायगड जिल्ह्यात शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली. भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करून टायर जाळले, महामार्ग रोखला. याची तातडीने दखल घेत दुसऱ्याच दिवशी (19 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी रायगड पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. तेव्हापासून आजपर्यंत रायगडचा पालकमंत्री कोण असेल, हे स्पष्ट झालेले नाही. आज उद्या पालकमंत्री पदाचा निर्णय होईल, असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी वारंवार जाहीर सभेत सांगितले.मात्र आज पर्यंत भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ काही पडत नाही आणि पालकमंत्री पदाचा कोट ही चढविता येत नाही.
पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर
अशातच आदिती तटकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग्जवर ‘फिक्स पालकमंत्री’ असा उल्लेख केल्यामुळे पालकमंत्रिपदाच्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. रायगड जिल्ह्याला कधी पालकमंत्री मिळणार, हा प्रश्न दोन महिन्यांपासून विचारला जातोय. मात्र, आमच्यात कुठलाही वाद नाही, असे जाहीर सांगणाऱ्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदाचा निर्णय होत नसेल तर महायुतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचे म्हणायचे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
रायगड मध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्यातच माणगाव येथे अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा फलकची चर्चा जोरदार आहे. मंत्री अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकावर फिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे स्तरावर चर्चेला उधाण आले असून राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा सुरू आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना मध्ये वाद सुरू आहे.त्यातच आता अदिती तटकरे यांच्या वाढदिवस निमित्त लावण्यात आलेल्या फिक्स पालकमंत्री असा उल्लेख आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
तटकरे कुटुंबीयांकडून औक्षण