रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चोरी आणि दरोड्यांचे सत्र सुरू असताना माणगांव तालुक्यात चॉकलेट कॅडबरी आणि ते थेठ सोने चांदी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे यामध्ये माणगाव शहरातील सुशिक्षित लोकांची सोसायटी समजल्या जाणाऱ्या माणगांव पुणे म्हणजेच दिघी पुणे हायवेवर असलेल्या “अमित कॉम्प्लेस “वसाहतीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत सुमारे ५लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत माणगाव अमित कॉम्प्लेक्स मधील सुमारे ३ फ्लॅट व एक बंगलो या चोरट्यानि फोडला आहे त्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अमित कॉम्प्लेक्स च्या बी विंग मधील रहिवाशी ज्योती शंकर यांच्या घरातील ३ लाख किंमतीचे सोने चांदीचे दागिने ८० हजार रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.तसेच त्यांच्या समोर राहणारे हे शासकीय कर्मचारी असून व ते बॅचलर असल्याने त्यांनी आपल्या घरातून काय गेले ? हे सांगणे टाळले आहे.
मात्र हा जबरी चोरी दरोडा माणगांव मधील अमित कॉम्प्लेक्स मध्ये पडला आहे आणि लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाज्यांचे कडी कोयनडे तोडून लंपास केला आहे. अशी माहिती समोर यामध्ये प्रसिद्धी माध्यमासमोर अनेक सीसी टीव्ही फुटेज व व्हिडीओ समोर आले आहेत.
यामुळे माणगाव पोलीस थंडी मध्ये सुस्त आहेत आहेत का? सुरक्षा यंत्रणा हफ्तेखोरीत सुस्त आणि चोरट्यांचा धुमाकूळ मस्त अशी परिस्थिती माणगांवमध्ये निर्माण झाली आहे का? असा उद्विग्न सवाल माणगांव मधील सुजाण नागरिक उपस्थित करत असून अशी चर्चा माणगाव तालुक्यातील बऱ्याच अश्या नाक्या-नाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे.
यावर आळा बसत नसेल तर माणगांव तालुक्यातील सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे आणि तशी मागणी देखील महाराष्ट्र शासनाकडे केली जाणार असल्याची माहिती माणगांव मधील सुजाण नागरिक सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.