गेले ११ वर्ष माणगाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या माणगाव तालुका पाटबंधारे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा १० वा वर्धापनदिन सोहळा ३ डिसेंबर रोजी माणगांव शहरातील कुणबी समाज हॉल येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नथुराम पाष्टे,माणगांव स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक जितेन रामुगडे, पेन्शनर फेडरेशन जिल्हाध्यक्ष व संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शंकर पवार,सरचिटणीस काशिनाथ जाधव,सहाय्यक लेखाधिकारी पूजा घरत,खजिनदार राम टेम्बे, सचिव बाळ उभारे,सहसचिव नारायण मालोरे,विनायक सापळे,नथुराम लहाने,रमेश डवले,विष्णू सावंत ,सुरेखा यादव,वैशाली बामुगडे व बहुतांश सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ७५ वर्षे वयोपूर्ती झालेल्या जेष्ठ सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये यावेळो नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल राकेश सावंत, तर मा.ता रा काँ.अध्यक्षपदी निवड म्हणून बाळाराम (काका)नवगणे, तर ७५ वर्ष वयोपूर्ती म्हणून साबाजी पालकर, राजाराम वाघमारे,रुख्मिनी शिंदे,यशोदा महाडिक, जयवांती टेम्बे,सरस्वती माठल,लक्षमी डवले,तुकाराम मुंढे, शांताराम फराडे आदींचा सत्कार करण्यात आला.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात माणगाव तालुका लघुपाटबंधारे खाते सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या १० वर्धापनदिनी प्रास्ताविक व मनोगत उपाध्यक्ष शंकर पवार यांनी केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.