रविवार दि.३० व सोमवार दि.३१ मार्च दोन दिवसांपासूनच वातावरण ढगाळ, ३९° ते ४१° सेल्सियस तापमानात गुढीपाडवा, रमजान ईद हे हिंदु मुस्लिम सण मोठ्या शांततापूर्ण वातावरणात साजरे झाले. तसेच मंगळवार दि.१ एप्रिल २०२४ रोजी सकाळ पासूनच पावसाच्या गडद सावटात काही ठिकाणी तुरळक पावसाचे थेंब देखील ठिबकत दबा धरुन बसलेला पाऊस आणि कंटाळवाणे वातावरण अनुभवास येत आहे.
मंगळवार दि.१ एप्रिल रोजी दुपारपर्यंत पाऊस आता पडेल, मग पडेल अस वाटत तो सर्वांचे एप्रिल फूल करत दबा धरुन बसला होता. प्रचंड उष्मा जाणवत असल्याने जनजीवन हैराण अंगातून जलधारा वाहत तो अंगातूनच गळत होता. अशात थंड पेय, माठातील गार पाणी पिण्याच्या तीव्र इच्छेने घशाला कोरड जाणवत आहे. पावसाळा दोन मासाचे अंतरावर आला आहे. त्या आधी या वळीवाची वळवळ सुरु झाली आहे. सुदैवाने वेगवान वादळी वारे नाहीत ही त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणावी लागेल. रायगड जिल्ह्यात बागायती पिक आंब्यासाठी ही भितीदायक परिस्थिती अलिकडे दरवर्षीच अनुभवास येत आहे.
भाजीपाल्यावर किड पडुन तोही धोक्यात, या अवकाळीचा फटका बळीराजासह सर्वांच्याच वाट्याला येत आहे. सोन्या सारखे आंबा पिक धोक्यात अनाकलनीय वातावरण, ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड, जंगलांना लागणारे वणवे नैसर्गिक राखीव पश्चिम घाटी वनसंपदा परिसरात बेसुमार अतिक्रमणे या साऱ्याचा परिपाक हे असले वातावरण आता जनतेच्या अंगवळणी पडले आहे. आपण स्वतंत्र भारतीय नागरीकांनी याचा सामना करावा तरी कसा? हिच ती आत्मचिंतनाची वेळ आहे.
कारण वृक्षरोपणाचा नुसता दिखावा कोट्यावधीचे उपक्रम पण प्लास्टिकचा सुनियोजीत वापर आणि रिसायकलिंग करण्यात आपण सपशेल अपयशी ठरत फक्त आभासी उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी धावतोय, प्रत्यक्षात प्रत्येकाने याचा विचार करुन मला स्वतःला पर्यावरण वाचविण्यात काय करता येईल? याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाने जसे आपले घर स्वच्छ करतो तसेच आपल्या अवती भवती परिसारातील प्रदूषण रोखण्यात किती सहभाग नोंदवत आहोत याचे गंभीर पणे अवलोकन केले तर आणि तरच आपल्या भविष्यातील पिढीचे चांगभले होईल.
अन्यथा दूसऱ्याकडे बोट दाखवून हाती काहीच लागणार नाही, हे सर्वच जाणतात. परिसरातील नद्या, जलस्त्रोत, वनसंपदा, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राखणे रस्त्यांच्या कडेला हिरवाई, सावली निर्माण करण्यासाठी वृक्षरोपण करणे, असलेली झाडे विकासकामे करताना कशी वाचविता येतील, यासाठी पावल टाकणे, हे सर्वस्वी आपल्याच हाती आहे. जगा आणि जगू द्या, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळणे आज जरी अशक्य झाले आहे तरीही रिसायकलिंग योग्य संकलन करुन अनावश्यक प्लास्टिक वापर थांबविणे सर्व मिळून जनजागृतीपर संस्कार करणे आवश्यक झाले आहे.
नाहीतर रोजच आपण वाचतोय, पाहतोय भूकंप, प्रलय, रोगराई गंभीर आजार एकंदरीत वळीवाचा पाऊस आणि वाढती उष्णता या धोक्याच्या घंटानादात संपूर्ण मानवी जीवन संकटात आले आहे. हे कुण्या ज्योतिष्याला विचारणे न लागो! वरकरणी दिसताना दिसणारा वळीवाचा पाऊस किती संकट घेऊन येत आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, रोज बदलणारे अनाकलनीय हवामानाला इतक्या हलक्यात घेणे ही फार मोठी चुक आपल्या हातुन आपल्याच विनाशास कारणीभूत ठरेल हे मात्र निश्चित आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.