माणगांव ( रविंद्र कुवेसकर ) : माणगांव नगरपंचायती मध्ये शिवसेना – भाजप यांनी एकत्र येत माणगांव शहर विकास आघाडी स्थापन करून २०२२ मध्ये निवडणूक लढविली होती आणि बहुमत घेत सत्ता मिळविली. आघाडीतील सर्व पक्षांना व ज्येष्ठांना संधी देण्याच्या धोरणानुसार सचिन बोंबले यांनी सव्वा वर्ष पद सांभाळल्या नंतर उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेवर भाजपचे राजेश मेहता यांची आज बुधवार दिनांक १७ मे रोजी निवड करण्यात आली.
नगरपंचायतीचे सध्याचे संख्याबळ पाहिले तर माणगाव शहर विकास आघाडीकडे ९ जागा असून राष्ट्रवादी व शेकाप आघाडीकडे ८ जागा आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या हर्षदा काळे यांनी राजेश मेहता यांच्या विरुद्ध उपनगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला होता. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हर्षदा काळेंचा पराभव करत राजेश मेहता विजयी झाले.
उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राजेश मेहता म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवत जी जबाबदारी मला दिली आहे ती निश्चितच नगराध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करीन. तसेच माणगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करीन.
यावेळी उपस्थितांकडून राजेश मेहता यांना पुष्पहार घालत पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. तसेच निवड जाहीर झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक देखील काढण्यात आली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.