माणगांवात तयार झालेल्या Airport चा विद्यार्थ्यांनी लुटला बघण्याचा आनंद

माणगावात तयार झालेल्या एयरपोर्ट चा विद्यार्थ्यांनी लुटला बघण्याचा आनंद
माणगांव ( राम भोस्तेकर ) 
माणगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या युगात अनेक क्षितीज गाठण्यासाठी प्रोत्साहन देणार्या सुधाकर नारायण शिपुरकर, गणेश यशवंत वाघरे, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रत्यक्षात विमानतळाची हुबेहूब प्रतिकृती तयार  करण्यात आली होती. हे  विमानतळ पाहून आम्ही विमानतळावरच आहोत याचा पदोपदी विद्यार्थ्यांना भास होत होता. त्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले. 
हे विमानतळ प्रदर्शन आणि प्रतिकृती मुंबई येथील स्वयम् या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विमानतळाच्या कामकाजाची माहिती मिळावी आणि भविष्यात रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विमानतळ, विमानप्रवास, धावपट्टी, नियोजन आणि व्यवस्थापन, नियंत्रण, विमान वाहतूकीचे टप्पे, मालवाहू विमाने, विमाने उतरविणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, देश आणि परदेशातील विमानतळ, विमानप्रवास, धावपट्टी आदी बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवेतील शैक्षणिक उपक्रम, रोजगाराची साधने, उपलब्ध संधी यावर आधारित सखोलपणे माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले. हे विमानतळ प्रदर्शन पाहून काही विद्यार्थ्यांनी भविष्यात वैमानिक आणि हवाई सुंदरी होण्याची इच्छा व्यक्त केली. बर्याच विद्यार्थ्यांना कुतुहल वाटले तर काहींची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे भले मोठे विमानतळ प्रदर्शन पाहून एक दिवस तरी विमानप्रवास करणार असल्याचे काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले. हे विमान प्रदर्शन सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी पाहून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading