माणगांव शिक्षण प्रसारक मंडळ आणि रणपिसे क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने एज्युकेशनल अवेअरणेस प्रोग्राम युनिटच्या संकल्पेनेतून संस्थेचे अध्यक्ष मा. राजीवजी साबळे यांच्या मार्गदर्शना खाली माणगांवमध्ये वेध भविष्याचा.. शिक्षणातील संधी हा कार्यक्रम इयत्ता ११ वी सायन्सच्या विद्यार्थ्यां साठी दि.१८ मार्च २०२५ रोजी MHT CET टेस्ट आणि दि.२१ मार्च रोजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी सुप्रसिद्ध शिक्षक तज्ञ मार्गदर्शक डॉ. दिलीप गोविंदराव देशमुख यांचे मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
२०० विदयार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ. देशमुख विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली ऍबीलिटी प्रमाणे पुढील शैक्षणिक दिशा ठरवायला हवी. ISRO, IISER साठी असंख्य विदयार्थ्यांची भारताला गरज आहे. MHT CET साठी चांगला अभ्यास करा. चांगलं कॉलेज निवडून योग्य ठिकाणी करिअरची सुरुवात करा असे सांगीतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल डी. एम. जाधव यांनी या संपूर्ण प्रवासात अत्यंत अभ्यासू नियोजन केले. कॉलेज मधील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. रणपिसे क्लासेस नेहमीच माणगांवच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल होण्यासाठी कार्यक्रम राबवत आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाने विदयार्थ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. अनेक विदयार्थ्यांनी कार्यक्रम संपल्या नंतर सुद्धा डॉ. देशमुख यांना अनेक प्रश्न विचारत जिज्ञासा दाखविली. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याची पोचपावती मिळाली.
माणगांव मधील शिक्षण सदृढ करण्यासाठी एकत्रित काम करण्याची तयारी संतोष रणपिसे यांनी बोलून दाखविली. रणपिसे क्लासेसने सर्व सहकार्याबद्दल माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे आभार मानले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.