माणगांवच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक भर! विठाबाई गोगावले बीएससी नर्सिंग कॉलेजला राज्य सरकारची मान्यता

खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून माणगांव नर्सिंग कॉलेजला मान्यता

माणगांव (रविंद्र कुवेसकर) :
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले बीएससी नर्सिंग कॉलेजला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण घेता येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही मान्यता मिळवून देण्यात आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले. या कॉलेजसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांची मान्यता मिळाल्याने हे रायगड जिल्ह्यातील पहिले अधिकृत बीएससी नर्सिंग कॉलेज ठरले आहे.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी या संपूर्ण प्रयत्नासाठी खासदार तटकरे यांचे आभार मानले. येत्या शैक्षणिक वर्षापासून ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, गुणवत्तेच्या आधारे प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी नवे संधीचे दार खुले
  • स्थानिक विद्यार्थ्यांची गैरसोय संपणार – अलिबाग, मुंबई, पुण्यासारख्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही.
  • छात्रवृत्ती सुविधा – मागासवर्गीयांसाठी भारत सरकार आणि टाटा ट्रस्ट शिष्यवृत्तीची सोय.
  • प्रात्यक्षिक प्रशिक्षण – माणगांव उपजिल्हा रुग्णालय, राऊत हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल, पनवेल येथील रुग्णालयांमध्ये.
  • भविष्यातील योजना – ए.एन.एम., जे.एन.एम. कोर्स आणि मेडिकल कॉलेज व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापनेचा मानस.
  • वस्तीगृह सुविधा उपलब्ध – ग्रामीण आणि दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा.

🏫 शैक्षणिक संकुलातील इतर संस्था:
  • द.ग. तटकरे महाविद्यालय
  • अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय
  • मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळा
  • माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय
  • सुधाकर शिपुरकर प्राथमिक शाळा
  • गणेश वाघरे माध्यमिक इंग्रजी शाळा

या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, शाळा समिती चेअरमन नरेंद्र गायकवाड, श्रीमती विठाबाई मारुती गोगावले बीएससी नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉ. गौतम राऊत, प्राचार्या महरोश सनगे, नितीन बामगुडे, अंकीता साबळे, औदुंबर गायकवाड आणि पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading