माझ्या आयुष्यातील हा क्षण भावनिक, अभिमानाचा व आनंदाचा : खा.सुनील तटकरे

sunil-tatkare.1
नागोठणे ( महेंद्र माने ) : येथील पोलिस ठाण्याच्या समोरील चौकाचे जेष्ठ समाजसेवक स्व.पांडुरंग गोविंद उर्फ तात्यासाहेब टके चौक असे नामकरण झालेल्या फलकाचे लोकार्पण सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, नरेंद्र जैन, सदानंद गायकर, शिवराम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवार 06 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
त्यावेळी खा. सुनील तटकरे यांनी माझ्या आयुष्यातील हा क्षण भावनिक, अभिमानाचा व आनंदाचा असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला संतोष कोळी, गजानन रावकर ,हरिष काळे, डॉ.राजेंद्र धात्रक, अनिल काळे, संजय महाडीक, उदय भिसे, असपाक पानसरे, सचिन मोदी, बाळासाहेब टके, सचिन कळसकर, सिराज पानसरे, राजेंद्र शिंदे, शेखर घाडगे, संतोष पवार, सुनील यादव, अशोक हुजरे यांच्यासह भाई टके, हरिष टके व टके परिवार तसेच तालुक्यासह विभागातील नागरीक व महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामकरण फलकाचे लोकार्पण झाल्यानंतर ग्रामपंचायत शिवगणेश सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खा.सुनील तटकरे यांनी माझ्या आयुष्यात हा क्षण भावनिक, अभिमानाचा व आनंदाचा आहे. समाज रचनेत, राजकारण, समाजकारणात तालुक्याची महत्वाची भूमिका बजावणारे तात्यांसाहेबांचे नाव ग्रामपंचायतने एका चौकाला दिले त्याबद्दल सरपंच व ग्रामपंचायतचे आभार व्यक्त करीत असून ज्यावेळी ऊन पाऊस येत असतो त्यावेळी इंद्रधनुष्य आकाशात दिसते. तसेच आज चौकाला नाव देत असताना तात्यासाहेबांच्या विचारांचे,अभिमानाचे, स्वाभिमानाचे,सद्गती भावनेचे व भावनेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य आज परिसरात दिसत आहेत.
आजचा कार्यक्रम भावनिक असून राजकरणात राजकीय मतभेद असले तरीही जिल्ह्यात व तालुक्यात तात्यांचा दबदबा होताच. अल्प समाजात जन्मलेले तात्यांनी बहुजन समाजाचे प्रेम मिळविणे सोप्पं नव्हतं. छोट्याशा व्यवसाय करीत असताना त्यांनी तात्यांचा व माझ्या वडिलांचा स्नेह आयुष्य भराचा राहिला व तो आज तीन पिढ्यांपर्यंत चालत आला आहे. गावातील कोणतीही कामे व समस्या तात्या कोणतेही मतभेद, राजकारण न करता नेहमी सोडवित असत व आलेली व्यक्ति समाधानाने परत जात असल्याने येणार्‍या जाणार्‍यांचा आधार हे तात्या होते.
मलाही त्यांच्या सोबत काम करण्याची संधि मिळाली. वडिलांच्या निधनानंतर ते पहाडासारखे आमच्या पाठी उभे राहून प्रत्येक प्रसंगी ते आमच्यासोबत राहिले. माझ्या पहिल्या आमदारकीच्या वेळी प्रांत कचेरीत तात्यासाहेब माझ्याबरोबर आले, त्यावेळचा फोटो माझ्या आयुष्यातील मोठा अनमोल ठेवा आहे. आज मला समाधान वाटत आहे की, आज येथे जमलेले सर्व राजकीय पक्षाचे सहकारी व गावातील नागरिक उपस्थित राहून तात्यांची आठवण किती चिरकाळ आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम असल्याचे सांगून नवीन पिढीला या चौकात आल्यानंतर तात्यासाहेबांच्या व्यक्तिमहत्वाची क्षणभर आठवण राहणार असल्याचे शेवटी खा.तटकरे यांनी सांगितले.
तात्यांची नात जान्हवी पंडित हिने आमचे बाबा (आजोबा) करीत असलेले समाजकार्य आम्ही लहानपणापासून जवळून पाहिले असून आमच्या घरी नेहमी लोकांची गर्दी असायची ते आम्हाला नको तिथे वाद घालत आपली ऊर्जा वाया न घालविता जिथे पाहिजे तिथे जरूर बोला असे नेहमी सांगत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.मिलिंद धात्रक,सदानंद गायकर,नरेंद्र जैन यांनीही तात्यांच्या महान कार्याची माहिती व आठवणी या निमित्ताने उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading