माझी वसुंधरा सर्वेक्षणात कोकण विभागात अलिबाग नगर परिषदला तृतीय क्रमांक; 50 लाखाचे बक्षीस जाहीर

Alibag Nagar Palika

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 

पर्यावरण व वातावरण बदल विभागाने पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतनकरून शाश्‍वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’मध्ये अलिबाग नगरपरिषदने सहभाग घेतला होता. माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केलेल्या नगरपरिषदांचा दि. २७ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून अलिबाग नगरपरिषदेने महाराष्ट्र राज्यात २४वा क्रमांक पटकावला आहे. तसेच, १५हजार ते २५ हजार या लोकसंख्येच्या प्रवर्गामध्ये कोकण विभागात तृतीय क्रमांक पटकाविला असून शासनाकडून तब्बल रु. पन्नास लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
वसुंधरा अभियान ४.० मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपायांची अंमलबजावणी करणे आणि वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक कृती उपक्रमांवर नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे, या बाबी समाविष्ट केल्या आहेत.
माझी वसुंधरा अभियान हे दरवर्षी संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. याअंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांच्या आधारे विविध घटकांची तपासणी केली जाते. यात शहरात एकूण राबविण्यात आलेले वृक्षारोपण व पूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन, तसेच घनकचरा व्यवस्थापन, सौरउर्जा प्रकल्प, शहरातील सुशोभीकरण आणि हरित क्षेत्रांची, जल स्त्रोतांची निगा राखणे अशा नानाविध उपक्रमांची तपासणी शासनामार्फत त्रयस्थ संस्थेद्वारे केली जाते. तसेच, शहरातील नागरिकांकडून सर्वेक्षण दरम्यान प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या.
या अभियानाची रचना कार्बन सिक्वेस्ट्रेशन, हरित वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या वातावरणीय बदलाच्या तीन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान निसर्गाच्या भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच घटकांना संबोधित करून आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखले आहे.
निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली. गेल्या १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत डेस्कटॉप मूल्यमापनासाठी ८१००, फिल्ड मूल्यमापनासाठी ३३०० अशा एकूण ११४०० गुणांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. त्यात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. अभियानाचे डेस्कटॉप मूल्यमापन १५ जून २०२४ रोजी तर फिल्ड मूल्यमापन ८ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले होते.
या सर्वेक्षणात संपूर्ण राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती सहभागी झालेले होते. या अभियानात अलिबाग नगर परिषदेने उच्चतम कामगिरी केलेली आहे. यासाठी नगर परिषदेच्यावतीने मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी या अभियानासाठी सर्व नागरिक, नप कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे स्वच्छता कर्मचारी वर्गाचे देखील अभिनंदन केले आहे.
अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियंता प्रियांका मोरे,आरोग्य विभाग लिपिक नामदेव जाधव आरोग्य निरीक्षक धनंजय आम्बरे,शहर समन्वयक: आर्या जाधव ,मुकादम प्रकाश तांबे अधिकारी आणि पालिकेचे इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अभियानात उत्तम कामगिरी बजावून पंधरा हजार नगरपालिका नगरपंचायत गटामध्ये राज्यात २४ वां तर कोकण विभागात तृतीय क्रमांक मिळविला. त्यासाठी पन्नास लाखाचे बक्षीस पालिकेला मिळाले.लवकरच महाराष्ट्र शासन स्तरावर सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि रक्कम बक्षीस स्वरूपात वितरीत केली जाणार आहे.
———————————————
अलिबाग नगरपरिषदेची माझी वसुंधरा अभियानातील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले अलिबाग आता स्वच्छतेच्या कामगिरीत देखील अग्रेसर झाल्याचे दिसून येत आहे. अलिबाग शहरामध्ये नगरपरिषदेने शहर सौंदर्यीकरण अंतर्गत विविध ठिकाणी काम केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading